NSK26H34970
जळगाव : सुशोभीकरणाबाबत उपमहापौर मनोज चौधरी यांना निवेदन देताना जयसिंग वाघ व पदाधिकारी
चौफुलीवर अजिंठा लेणीचे शिल्प साकारावे
अजिंठा हाउसिंग सोसायटीची मागणी
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १३ : अजिंठा चौफुलीचे सुशोभीकरण करण्यासाठी आवश्यक खर्चाला मंजुरी मिळाली असल्याने अजिंठा चौफुली येथील सर्कलमध्ये पद्मपाणी बुद्ध यांची मूर्ती बसविणे, रस्त्यावर अजिंठा गेटची प्रतिकृती उभारणे, सर्कलवर अजिंठा लेणीतील निवडक भित्तीचित्रे चित्रित करणे आदी मागण्यांचे निवेदन आज उपमहापौर मनोज चौधरी यांना देण्यात आले. अजिंठा हाउसिंग सोसायटीतर्फे देण्यात आलेल्या निवेदनासोबत साहित्यिक जयसिंग वाघ यांच्या संकल्पनेतील संकल्पचित्र जोडण्यात आले आहेत.
संकल्प चित्राविषयी माहिती देताना श्री. वाघ यांनी सांगितले, की जळगाव शहर ज्याप्रमाणे सुवर्ण नगरी, केळीचे शहर म्हणून ओळखले जाते त्याचप्रमाणे ''अजिंठा लेणीचे प्रवेशद्वार'' म्हणून ओळखले जाते. जळगाव शहरापासून अवघ्या ४९ किलोमीटर अंतरावर जगप्रसिद्ध अजिंठा लेणी असल्याने त्या लेणीची ओळख निर्माण करणारे गेट, चित्र, मूर्ती अजिंठा चौफुलीवर साकारल्यास अजिंठा चौक एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून ओळखले जाईल तसेच शहराच्या सौंदर्यात भर पडेल.
संकल्पचित्र पाहून उपमहापौर मनोज चौधरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या संदर्भात लवकरच आयुक्तांसोबत बैठक घेऊन यावर निर्णय घेऊ. तेव्हा त्या बैठकीस आपणास बोलावले जाईल, असे सांगितले. ज्येष्ठ साहित्यिक जयसिंग वाघ, चेअरमन दिलीप सपकाळे, ॲड. आनंद कोचुरे, दिलिप तासखेडकर, अशोक सैंदाणे, नथू अहिरे आदी उपस्थित होते.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.