NSK26H34347
जळगाव : स्वच्छता मोहिमेत ट्रान्सपोर्टनगरात पाहणी करताना महापौर दीपमाला काळे, नगरसेवक सुनील खडके, डॉ. विश्वनाथ खडके, हर्षल मावळे, नगरसेविका रंजना वानखेडे, वंदना इंगळे आदी.
....
कचऱ्याचे ढीग, अतिक्रमणावरून महापौरांचा संताप
-----
प्रभागातील स्थितीची पाहणी; दोषींवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २ : महामार्गालगत साचलेला कचरा, रस्त्यांवर पडलेले भंगार व खुल्या भूखंडावर उभ्या केलेल्या जुन्या वाहनांमुळे शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ‘महापौर स्वच्छता संकल्प अभियानां’तर्गत महापौर दीपमाला काळे यांनी सोमवारी (ता.२) प्रभाक क्रमांक १६मधील जुने जळगाव, ट्रान्सपोर्टनगर व लक्ष्मीनारायण नगर परिसराची पाहणी केली.
यावेळी अस्वच्छता व अतिक्रमणांचे प्रकार पाहून त्यांनी दुकानदारांसह संबंधित अधिकाऱ्यांना खडसावले. अतिक्रमणे हटविणे, कचरा उचलणे व नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले.
जुने जळगावातील विठ्ठल मंदिर परिसरात नळांच्या तोट्या तपासण्यासह अमृत योजनेची प्रलंबित नळजोडणी तातडीने पूर्ण करण्यास सांगितले. रस्त्यावर पडलेले बांधकाम साहित्य हटविण्याचेही आदेश दिले. कोल्हे विद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील नाल्यात थर्माकोलचे बॉक्स व शेवाळ मोठ्या प्रमाणात साचल्याचे निदर्शनास आले. हा कचरा एमआयडीसी परिसरातून येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोकलँडच्या साहाय्याने नाल्याची तातडीने सफाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी माजी उपमहापौर तथा नगरसेवक सुनील खडके, डॉ. विश्वनाथ खडके, हर्षल मावळे, प्रदीप रोटे, नरेंद्र सोनवणे, नगरसेविका रंजना वानखेडे, वंदना इंगळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
ट्रान्सपोर्टनगरात अस्वच्छता
ट्रान्सपोर्ट नगरात महामार्गालगत कुशनचा कचरा, वाहनांच्या फुटलेल्या काचा व भंगार पडल्याचे आढळले. त्यामुळे संबंधित दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश महापौरांनी दिले. बाजारपेठेतील खुल्या जागेत डंपर व जुनी वाहने उभी करून जागा अडविल्याने दुकानदारांना वाहने तत्काळ हटविण्याचा इशारा दिला. जागा रिकामी न केल्यास महापालिकेमार्फत कारवाई करण्याचे स्पष्ट केले.
साई पार्कजवळील नाल्यालगत संरक्षण भींत, रेड स्वस्तिकच्या रिकाम्या जागेत महापालिकेची कार्यालये उभारण्याची शक्यता तपासण्यास सांगितले. लक्ष्मीनारायण नगरातील नाल्यात कचरा टाकणाऱ्यांवर दंड, नाल्यांची सफाई व बंद पथदिव्यांचे प्रश्न तातडीने सोडविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.