नाशिक

जिल्हा बँजिल्हा बँक निवडणूकक निवडणूक

CD
जळगाव जिल्हा बँक निवडणूक (लोगो) --- महायुतीचे जागावाटप ठरले, आता माघारीकडे लक्ष --- महाविकास आघाडीला तीन जागा दिल्या, तर निवडणूक होणार बिनविरोध सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १५ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसची महायुती ठरली आहे. भाजपला १० जागा, शिवसेना ७, राष्ट्रवादी काँग्रेसला ४ जागा असे सूत्र ठरले आहे. असे असले तरी अनेक ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. त्यात नेमकी कोण माघार घेते, याकडे आता लक्ष लागले आहे. माघारीसाठी सोमवार (ता. १६) व मंगळवार (ता. १७) असे दोनच दिवस शिल्लक आहेत. दरम्यान, महायुतीने तीन जागा महाविकास आघाडीला सोडल्या, तर ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. मुक्ताईनगर, चोपडा, बोदवडच्या जागांवर महायुतीचा अजून निर्णय झालेला नाही. तो वाद सोमवारपर्यंत मिटेल, अशी शक्यता आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुतीचे प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीने तीन जागांची मागणी केली आहे. त्या जागा महायुतीने सोडल्या तर ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात आहे. जागावाटप, महाविकास आघाडीला सोबत घ्यायचे किंवा कसे याबाबत जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील आदी पदाधिकाऱ्यांच्या रात्री एका हॉटेलमध्ये बैठक सुरू होती. आता माघारीनंतरच चित्र स्पष्ट होईल. ------- महायुतीच्या निर्णयाकडे लक्ष महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या जिल्हाध्यक्षांची बैठक शनिवारी (ता. १४) झाली. तीत महायुतीने तीन जागा दिल्या, तर निवडणूक बिनविरोध करू, अन्यथा निवडणूक बिनविरोध होणार नाही, असे ठरले आहे. महाविकास आघाडीच्या या प्रस्तावाला महायुतीचे नेते कसा प्रतिसाद देतात, याकडेही लक्ष लागून आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वंदे भारत ट्रेनचे ब्रेक फेल, तरी ४६३ किमी धावली; रेल्वेच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड, नेमकं काय घडलं?

''आता सेल्फी पोस्ट केली की...''; PM मोदींच्या 'त्या' विधानावरून CJP ची उपरोधिक टीका, नेमकं काय म्हणाले?

Latest Marathi News Live Update : अमित शाह यांची मुरलीधर मोहोळ यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

Tiruchendur Soorasamharam 2026 : समुद्रकिनाऱ्यावर लाखोंचा जनसागर, ४,१०० पोलिसांचा कडेकोट पहारा! दक्षिण भारतातील 'या' प्रसिद्ध मंदिरात रंगला ऐतिहासिक सोहळा

Solar Stock To Buy : ६ महिन्यांत ३३% परतावा! आता थेट ₹५०० पर्यंत झेप घेणार 'हा' सोलार शेअर; ब्रोकरेज फर्मचा मोठा सल्ला

SCROLL FOR NEXT