नाशिक

जिल्‍ह्यातील ८ आरोग्य केंद्रांना राज्यस्तरीय प्रमाणन

CD
टुडे पान ४ : शहर - जिल्हा ॲंकर --- जिल्‍ह्यातील ८ आरोग्य केंद्रांना राज्यस्तरीय प्रमाणन (उपशीर्षक) १२५ उपकेंद्रांनाही ‘एनक्‍यूएएस’; तीन उपकेंद्रांना राष्ट्रीय स्तरावरही मानांकन सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १३ : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानके (एनक्यूएएस) या उपक्रमांतर्गत जळगाव जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जिल्ह्यातील ८ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि १२५ उपकेंद्रांना राज्यस्तरीय एनक्‍यूएएस प्रमाणन मिळाले आहे. यापैकी तीन उपकेंद्रांनी राष्ट्रीय स्तरावरील प्रमाणनही मिळविले आहे. जळगाव जिल्ह्यात यापूर्वी २ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि १७ उपकेंद्रांना राज्यस्तरीय एनक्‍यूएएस प्रमाणन मिळाले होते. त्यानंतर आरोग्य विभागाने राबविलेल्या सातत्यपूर्ण गुणवत्ता सुधारणा उपक्रमांमुळे नव्याने ६ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि १०८ उपकेंद्रांनी हे प्रमाणन प्राप्त केले. त्यामुळे जिल्ह्यातील प्रमाणित आरोग्य संस्थांची एकूण संख्या ८ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि १२५ उपकेंद्रांवर पोहोचली आहे. यापैकी ३ उपकेंद्रांनी राष्ट्रीय स्तरावरही गुणवत्ता प्रमाणन मिळवून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या केंद्राचा आहे समावेश जिल्ह्यात राज्यस्तरीय एनक्‍यूएएस प्रमाणन प्राप्त झालेल्या आठ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वाकडी, वाकोद व नेरी (ता. जामनेर), पिंपरखेड (ता. भडगाव), लोहारा (ता. पाचोरा), ढेकू, मारवड व जानवे (ता. अमळनेर) या प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रमेश धापते, एनक्‍यूएएस नोडल अधिकारी डॉ. करिश्मा जैन, जिल्हा गुणवत्ता आश्वासन समितीचे डॉ. पंकज शिंपी यांनी नियोजनबद्ध पद्धतीने या मोहिमेचा पाठपुरावा केला. कोट आठ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि १२५ उपकेंद्रांचे राज्यस्तरीय प्रमाणन, तसेच ३ उपकेंद्रांचे राष्ट्रीय स्तरावरील प्रमाणन ही जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणेने गुणवत्ता, कार्यक्षमता आणि रुग्णसेवेबाबत केलेल्या प्रगतीची महत्त्वपूर्ण पावती आहे. या यशामुळे ग्रामीण भागात अधिक गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्याच्या प्रयत्नांना निश्चितच बळ मिळणार आहे. - करिश्‍मा नायर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashi Tharoor: भारत समिटमध्ये 115 परदेशी वक्त्यांना प्रवेश नाकारला; शशी थरूर यांचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप

IND vs NZ 4th ODI: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये Unplayable Deliveries असं काही नसतं, फलंदाजानं...; ८९ ऑल आऊटनंतर गौतम गंभीरकडून कानउघडणी

Thane Water Cut: ठाण्यात पुन्हा पाण्याचा ठणठणाट! सोमवारी २४ तास पाणीपुरवठा बंद; कोणत्या भागांना फटका?

वर्षा उसगांवकर यांचे पती कोण आहेत? सोशल मीडियावर एकही एकत्र फोटो का पोस्ट करत नाहीत? अभिनेत्रीने सांगितलं कारण!

Latest Marathi News Live Update : मुंबईतील मिठी नदीजवळ नाल्यात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT