JEE Mains Exam esakal
नाशिक

JEE Mains परीक्षा आता होणार जुन, जुलैमध्ये

अरूण मलानी

नाशिक : जॉइंट एन्ट्रन्स एक्‍झाम (जेईई) मेन्‍स (JEE Mains) परीक्षेच्‍या तारखांमध्ये पुन्‍हा एकदा बदल करण्यात आलेला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्‍सी (NTA) यांच्‍यातर्फे या संदर्भात सूचनापत्र जारी केले आहे. त्‍यानुसार पहिल्‍या सत्रातील परीक्षा २० ते २९ जून आणि दुसऱ्या सत्रातील परीक्षा २१ ते ३० जुलै या कालावधीत देशभरात पार पडणार आहे.

आयआयटी (IIT) व यांसारख्या राष्ट्रीय स्‍तरावरील अभियांत्रिकी संस्‍थांमध्ये प्रवेशासाठी जेईई मेन्‍स परीक्षा घेतली जाते आहे. पहिल्‍या सत्रातील परीक्षेला प्रविष्ट होण्याची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. यापूर्वी घोषित वेळापत्रकात बदल करताना पहिल्‍या सत्रातील परीक्षा २१ एप्रिल ते ४ मे या कालावधीत घेण्याचे नियोजित होते. तर दुसऱ्या सत्रातील परीक्षा २४ ते २९ मे या कालावधीत घेतली जाणार होती. परंतु एनटीए यांच्‍यातर्फे या वेळापत्रकात बदल केलेला आहे. सुधारित वेळापत्रकानुसार पहिल्‍या सत्रातील जेईई मेन्‍स परीक्षा २० ते २९ जून या कालावधीत पार पडेल. जेईई मेन्‍सचे दुसरे सत्र २१ ते ३० जुलै या कालावधीत होणार आहे. ही परीक्षा संगणकावर आधारित (कॉम्‍प्‍युटर बेस्‍ड टेस्‍ट) असल्‍याने सत्र पद्धतीने विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र उपलब्‍ध झाल्‍यानंतर त्‍यांच्‍या परीक्षेची तारीख व वेळेची अतिरिक्‍त माहिती मिळू शकणार आहे.

दुसऱ्या सत्रासाठी लवकरच नोंदणी

यापूर्वी जेईई मेन्‍सच्‍या पहिल्‍या सत्रासाठी नोंदणी करू न शकलेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी उपलब्‍ध असणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्‍या प्रवेशासाठी दोन वेळा परीक्षा घेतली जाणार आहे. या दुसऱ्या सत्रातील जेईई मेन्‍स परीक्षेला प्रविष्ट होण्यासाठी लवकरच नोंदणी प्रक्रिया सुरु होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

स्वतःला देशभक्त म्हणवता? मग यातील कोणकोणते चित्रपट तुम्ही पाहिलेत?

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

SCROLL FOR NEXT