Robbery latest marathi news esakal
नाशिक

Crime Update : दागिने, मोबाईलसह रोख रक्कम घरातून लंपास

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : घराचे दार उघडे असल्याची संधी साधत अज्ञात संशयितांनी घरातून दोन मोबाईल सोन्या- चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा ३३ हजारांचा ऐवज लंपास (Robbery) केला. (Jewellery mobile cash looted from home nashik Latest Crime News)

भद्रकाली पोलिस ठाण्यात रुकसाना पठाण यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. बागवानपुरा येथील रुकसाना पठाण यांच्या घरात शुक्रवार (ता. १५) सकाळी चोरी झाल्याची घटना घडली.

पठाण कुटुंबीय झोपेत असताना घराचे दार उघडे असल्याची संधी साधत चोरट्यांनी घरातील बेडरूममध्ये ठेवण्यात आलेले दोन मोबाईल, मिनी पर्समध्ये ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने आणि तीन हजाराची रोख रक्कम असा ३३ हजारांचा ऐवज चोरून नेला.

सकाळी मोबाईलचा अलार्म वाजला नाही. म्हणून रुकसाना यांनी उठून पाहिले असता चोरी झाल्याचा प्रकार लक्षात आला. त्यानंतर त्यांनी भद्रकाली पोलिसांशी संपर्क साधत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT