‘आनंदी जीवन’ विषयावर
ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २ : रोटरी क्लब जळगाव व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेच्या उद् घाटनप्रसंगी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. पवित्रा पाटील, वित्त अधिकारी व रोटरीचे सदस्य रवींद्र पाटील, सहप्रांतपाल अनिल कांकरिया, अध्यक्ष ॲड. हेमंत भंगाळे, मानद सचिव स्वाती ढाके यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यशाळेत सायबर सुरक्षा याविषयी कविता दातार यांनी डिजिटल व्यवहार, ऑनलाइन फसवणूक, सायबर गुन्हे, मोबाईलचा सुरक्षित वापर व आर्थिक फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, याविषयी माहिती दिली. ॲड. रूपाली भोकरीकर यांनी लिव्हिंग विलची संकल्पना, कायदेशीर महत्त्व, वैयक्तिक निर्णयस्वातंत्र्य व आयुष्याच्या महत्त्वपूर्ण टप्प्यावर व्यक्तीच्या इच्छेचा आदर याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. ‘आनंदी जीवन’ या विषयावर कंवरलाल संघवी यांनी हास्य, सकारात्मक दृष्टिकोन, मानसिक प्रसन्नता व आनंदी जीवनशैली या गोष्टींचे महत्त्व समजावून सांगितले. वय वाढणे ही नैसर्गिक प्रक्रिया असली तरी मनाने तरुण राहणे, प्रत्येक परिस्थितीत सकारात्मकता जपणे व हास्याला जीवनाचा अविभाज्य भाग बनवावे, असे आवाहन केले. डॉ. लीना चौधरी यांनी निरोगी व सक्रिय जीवनासाठी नियमित योगाभ्यास, संतुलित आहार, योग्य पोषण, व्यायाम व आरोग्याची काळजी यांचे महत्त्व त्यांनी सोप्या पद्धतीने स्पष्ट केले. कार्यक्रमासाठी प्रा. शुभदा कुलकर्णी, रवींद्र पाटील, विनया जोशी, योगेश गांधी, रितेश जैन, संजय दोशी, चंदन महाजन, योगेश चौधरी, पंकज जयस्वाल यांनी पुढाकार घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.