नाशिक

कालिका यात्रोत्सवात चोरट्यांची ‘हात की सफाई’

CD
यात्रोत्सवात दागिन्यांवर डल्ला मुंबई नाका पोलिसात सहा दिवसांमध्ये १६ तक्रारी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १८ : श्री कालिका देवी यात्रोत्सवात दररोज हजारो भाविकांची गर्दी असते. या गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी हात की सफाई दाखवत गर्दीत लहान मुले व महिलांना टार्गेट करीत त्याचे सोन्याचा ऐवज हातोहात लंपास केला आहे. सहा दिवसांमध्ये तब्बल १६ तक्रारी मुंबई नाका पोलिसात दाखल झाल्या आहेत. यामुळे यात्रोत्सवातील पोलिसांचा बंदोबस्त अन्‌ गस्त कुचकामी ठरत असल्याने महिलांमध्ये नाराजी असून, संशयित चोरट्यांना आळा घालण्याची मागणी भाविक महिलांकडून केली जात आहे. श्री कालिका देवी मंदिरात रविवार (ता. ११) पासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे. दररोज हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येत आहेत. गर्दीमुळे मंदिर परिसरात भाविकांची मोठी वर्दळ असताना सोनसाखळी चोरट्यांनी महिला व लहान मुले टार्गेट केल्याचे दिसून येत आहे. गेल्या रविवारपासून शुक्रवारपर्यंतच्या सहा दिवसांत सुमारे १६ महिलांच्या सोनसाखळ्या चोरीला गेल्या आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच मुंबई नाका पोलिसांनी चौकी उभारली आहे. तसेच, जादा फौजफाटाही तैनात केला आहे. होमगार्डसह पोलिस अधिकारी, अंमलदारांची यात्रेत गस्त घातली जात आहे. असे असले तरी गेल्या सहा दिवसात भाविक महिलांच्या सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. त्यामुळे पोलिसांच्या बंदोबस्तावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होतो आहे. यात्रोत्सवात जादा बंदोबस्त वाढविण्यासह चोरट्यांना अटकाव करण्याची मागणीसह मंदिर परिसरात नियमित पेट्रोलिंग आणि चोरट्यांचा शोध घेऊन कठोर कारवाईची मागणी महिला भाविकांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Farmer Loan Waiver: साताऱ्यात ७,७८९ शेतकरी कर्जमाफीपासून वंचित; कर्जमाफी होऊनही पात्रतेचा खोडा, धक्कादायक कराण आल समाेर!

सासऱ्यांनी सांगितलं एका वर्षाचा आत वजन घटव... कविता मेढेकर यांचा खुलासा, म्हणाल्या, 'माझे सासू-सासरे...'

Spinal Pain: पाठीच्या कण्याच्या आरोग्यासाठी कोणत्या कुशीवर झोपणे योग्य? पाठ टेकून झोपण्याचेही आहेत फायदे!

2026 च्या शेवटच्या 3 महिन्यांची बाबा वेंगांची भविष्य वाणी व्हायरल; ‘या’ राशींबाबत चर्चांना उधाण!

Latest Marathi News Live Update : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत ९९.७४ टक्के मतदान; ५,४०४ मतदारांचा सहभाग

SCROLL FOR NEXT