नाशिक

खरीप पीकविमा खरीप पीकविमा

CD
टुडे पान ४ (शहर -जिल्हा) --- NSK26H34925 जळगाव : जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना भाग्यश्री ठाकरे व पदाधिकारी. --- खरीप पीकविमा अर्जाचा मार्ग मोकळा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या शिष्टमंडळाच्या पाठपुराव्याला प्रतिसाद सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १३ : रावेर तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक महसूल मंडळांमध्ये नव्याने करण्यात आलेल्या वाडी विभाजनामुळे निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणींचा फटका प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील शेतकऱ्यांना बसत होता. काही गावांचे गट क्रमांक व क्षेत्र दुसऱ्या गावांच्या नोंदींमध्ये दिसत असल्याने सातबारा उताऱ्यावर पीकपेरा प्रतिबिंबित होत नव्हता. परिणामी, अनेक शेतकऱ्यांना खरीप पीक विमा अर्ज भरता येत नव्हते. या गंभीर प्रश्नाकडे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या रावेर लोकसभा जिल्हाध्यक्षा भाग्यश्री विवेक ठाकरे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले. वाडी विभाजनानंतर जिल्ह्यातील अनेक महसुली गावांतील गट क्रमांकांच्या पीकपेरा नोंदींमध्ये तांत्रिक विसंगती निर्माण झाल्याचे निदर्शनास आणून दिले. पीक पाणी पाहणी पूर्ण होऊन ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी मान्यता दिलेली असतानाही सातबाऱ्यावर पीकपेरा दिसत नसल्याने शेतकरी विम्यापासून वंचित राहत असल्याची वस्तुस्थिती शिष्टमंडळाने मांडली. यांची होती उपस्थिती जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना व चर्चा करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस विवेक ठाकरे, भुसावळ शहराध्यक्ष संतोष (दाढी) चौधरी, सीएससी सेंटरचे जळगाव विभागाचे निरीक्षक संजय खैरनार, शेतकरी प्रतिनिधी प्रभाकर महाजन, युवती संयोजिका कीर्ती कुलकर्णी व नयना दाभोडे यांची उपस्थिती होती. चौकट वाडी विभाजनातील तांत्रिक अडचण दूर जिल्हाधिकाऱ्यांनी एनआयसी आणि कृषी विभागाशी समन्वय साधून तांत्रिक त्रुटी तातडीने दूर करण्याचे आदेश दिले. पीक विमा अर्जाची अंतिम मुदत १५ नोव्हेंबरला असल्याने मुदतीपूर्वी शेतकऱ्यांना अडचण येऊ नये, यासाठी तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देशही दिले. या कार्यवाहीमुळे अवघ्या काही तासांमध्येच संबंधित तांत्रिक अडचण दूर करून शेतकऱ्यांना थेट ऑनलाइन पद्धतीने खरीप पीक विमा अर्ज सादर करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेला स्व. अजित पवार यांचं नाव मिळणार? आदिती तटकरेंनी स्पष्ट केली भूमिका

Neha Bora: नेहा बोरा म्हणतात 'मी स्त्री नाही अन् पुरुषही नाही'! नॉन-बायनरी म्हणजे नक्की काय?

Shashi Tharoor: भारत समिटमध्ये 115 परदेशी वक्त्यांना प्रवेश नाकारला; शशी थरूर यांचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप

Latest Marathi News Live Update : नाशिक रोड रेल्वे स्थानकावर आरपीएफची मोठी कारवाई, संशयिताकडून 1 कोटी 48 लाख 64 हजारांची रोकड जप्त

IND vs NZ 4th ODI: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये Unplayable Deliveries असं काही नसतं, फलंदाजानं...; ८९ ऑल आऊटनंतर गौतम गंभीरकडून कानउघडणी

SCROLL FOR NEXT