A magician twisting and cutting a lemon from a man esakal
नाशिक

Nashik News: खळबळजनक! सर्वतीर्थ टाकेद कुंडावर भरदिवसा अंधश्रद्धेचा प्रकार

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद येथील सर्वतीर्थच्या कुंडावर भरदिवसा अंधश्रद्धेचा प्रकार समोर आला आहे.

एक अनोळखी बाबा एका व्यक्तीच्या अंगा-खांद्यावरून लिंबाचा उतारा करून ते लिंबू कापून ते कुंडावर फेकत असल्याचे निदर्शनास आले. (Kind of superstition on Sarvatirth Taked Kunda daytime Nashik News)

ही गोष्ट कुंडावर आलेल्या भक्तांनी पाहिल्यावर त्यांनी मंदिरातील महंतांना सांगितली. महंतांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा बाबा तेथून काही हटला नाही. त्याने तेथे बिनदिक्कतपणे आपला टोटगा करण्याचा कार्यक्रम सुरू ठेवला.

यामुळे कुंडावर आलेले नागरिक भयभीत झाले. जेव्हा स्थानिक पत्रकाराने व्हिडिओ काढला, तेव्हाही या बाबाने आपला बुवाबाजीचा कार्यक्रम सुरूच ठेवला.

टोटगा पूर्ण झाल्यावर सर्व साहित्य तिथेच टाकून निघून गेला. दोन्ही व्यक्ती गावातील व परिसरातील नसल्याने अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

गुन्हा दाखल करा : चांदगुडे

सवतीर्थ टाकेद हे धार्मिक स्थळ असून, त्या ठिकाणी अंधश्रद्धेचा प्रकार घडणे, हे अत्यंत धोकादायक व गंभीर आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्याचा निषेध करीत आहे.

खरेतर करणी किंवा भानामती उतरविण्याच्या बहाण्याने त्या मांत्रिकाने त्याच्यावर जे उपचार केले, ते जादूटोणाविरोधी कायद्याच्या अंतर्गत गुन्हा ठरणारे आहे.

तरी संबंधितांना पकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump India Visit : डोनाल्ड ट्रम्प यांना आठवली दोन वर्ष जुनी मैत्री, लवकरच येणार भारत दौऱ्यावर; अमेरिकी दुतावासाने सांगितली इनसाईट स्टोरी...

'केस नं ७३' मध्ये अमित शिंदे साकारणार 'ही' भूमिका; उलगडणार गूढ रहस्य

Makar Sankranti Sale : घाई करा! मकर संक्रांतीनिमित्त 'स्मार्ट बाजार'ला मोठी ऑफर; 'या' वस्तू झाल्या एकदम स्वस्त

Weekly Horoscope 12 to 18 January 2026: मेष, कर्क अन् मकरसह 'या' राशीच्या लोकांना मिळेल त्रिग्रह योगाचा फायदा, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Commerce Graduates Protest : शासकीय भरती प्रक्रियेत कॉमर्स पदवीधरांवर अन्याय, विद्यार्थ्यांचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT