नाशिक

कुंभमेळा प्राधिकरणाचे बनावट इन्स्टाग्राम खाते तयार करणाऱ्या विरुद्ध सायबर पोलिसांत गुन्हा दाखल

CD
३६-२ कुंभमेळा प्राधिकरणाचे इन्स्टावर बनावट खाते ----------- सायबर पोलिसात गुन्हा दाखल ---------- सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.१५ : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळा प्राधिकरणाचे अधिकृत खाते असल्याचे भासवून नागरिकांची दिशाभूल करणारे बनावट इन्स्टाग्राम खाते तयार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सायबर पेट्रोलिंगदरम्यान प्रकार समोर आला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ------------ शहर सायबर पोलिसांची रविवारी (ता.१५) सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सायबर पेट्रोलिंग सुरू होती. इन्स्टाग्रामवरील ''ऑफिशियल.कुंभनगरी_नाशिक'' या खात्याची पाहणी करण्यात आली. या खात्यावर सिंहस्थ कुंभमेळ्याशी संबंधित विविध कार्यक्रमांचे रिल्स आणि पोस्ट प्रसारित करण्यात येत होते. मात्र, संबंधित खाते पाहिल्यानंतर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण, नाशिक या शासकीय कार्यालयाचे अधिकृत सोशल मीडिया पेज असल्याचा आभास निर्माण केला. नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याचे यावरून निदर्शनास आले. शासकीय यंत्रणेचे अधिकृत खाते असल्याचे भासवून माहिती प्रसारित केल्याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल. कुंभमेळा तसेच शासकीय योजना आणि विविध कार्यक्रमांसंदर्भातील माहिती नागरिकांनी केवळ शासनाच्या अधिकृत आणि सत्यापित सोशल मीडिया खात्यांवरूनच घ्यावी, सोशल मीडियावरील कोणत्याही खात्याला शासकीय अधिकृत पेज समजण्यापूर्वी त्याची सत्यता तपासावी. बनावट खात्यांवरील माहिती, लिंक किंवा संदेशांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस आयुक्तालयाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वंदे भारत ट्रेनचे ब्रेक फेल, तरी ४६३ किमी धावली; रेल्वेच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड, नेमकं काय घडलं?

''आता सेल्फी पोस्ट केली की...''; PM मोदींच्या 'त्या' विधानावरून CJP ची उपरोधिक टीका, नेमकं काय म्हणाले?

Latest Marathi News Live Update : अमित शाह यांची मुरलीधर मोहोळ यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

Tiruchendur Soorasamharam 2026 : समुद्रकिनाऱ्यावर लाखोंचा जनसागर, ४,१०० पोलिसांचा कडेकोट पहारा! दक्षिण भारतातील 'या' प्रसिद्ध मंदिरात रंगला ऐतिहासिक सोहळा

Solar Stock To Buy : ६ महिन्यांत ३३% परतावा! आता थेट ₹५०० पर्यंत झेप घेणार 'हा' सोलार शेअर; ब्रोकरेज फर्मचा मोठा सल्ला

SCROLL FOR NEXT