नाशिक

कुंभमेळ्यासाठी साधुग्राममध्ये पाणी पुरवठा योजना

CD
एन्कर ---------- साधुग्रामला चोवीस तास पाणी; १५५ कोटींची स्वतंत्र यंत्रणा निविदा प्रक्रियेला वेग; सांडपाणी व्यवस्थापनासाठीही १८८ कोटी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १३ : आगामी कुंभमेळ्यासाठी तपोवनात उभारल्या जाणाऱ्या साधुग्राममध्ये १० लाख साधू-महंत आणि भाविकांसाठी चोवीस तास पाणीपुरवठा केला जाणार आहे. सुमारे १५५ कोटी रुपये खर्चून स्वतंत्र जलवाहिन्या आणि वितरण यंत्रणेचे जाळे उभारले जाणार असून निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रयागराज कुंभमेळ्याला मिळालेला प्रचंड प्रतिसाद लक्षात घेवून नाशिक- त्र्यंबकेश्‍वर कुंभमेळ्यासाठी १० कोटींहून भाविक, तर सुमारे १० लाखांच्या वर साधु-महंत दाखल होतील, असा अंदाज आहे. कुंभमेळ्यासाठी दाखल होणाऱ्या आखाडे, साधु-महंतांसाठी तपोवन व परिसरात १,३८० एकर जागा घेतली जाणार आहे. यंदा तपोवन ते नांदूर गावापर्यंत आखाड्यांचा विस्तार केला जाणार आहे. तपोवनात कायमस्वरूपी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून, तपोवना व्यतिरिक्त नांदूरपर्यंतची जागा एका वर्षासाठी भाडेतत्त्वावर संपादित केली जाणार आहे. साधुग्राममध्ये चोवीस तास पाणीपुरवठा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून साधुग्रामसाठी स्वतंत्र जलवाहिन्या आणि वितरण यंत्रणा उभारली जाणार आहे. त्यामुळे पर्वणीच्या काळात पाण्याचा तुटवडा भासणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. सांडपाणी व्यवस्थापनासाठीही सुमारे १८८ कोटी रुपयांची कामे हाती घेतली जाणार आहे. लाखो भाविकांमुळे निर्माण होणाऱ्या सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन केवळ पाणीपुरवठाच नाही, तर सांडपाणी व्यवस्थापनासाठीही स्वतंत्र यंत्रणा उभारली जाणार आहे. त्यासाठी मलनिस्सारण केंद्रासोबतच संपूर्ण साधुग्राममध्ये मलवाहिन्यांचे जाळे विकसित केले जाणार आहे. -----------चौकट--------- साधुग्राममध्ये नियोजन - एकूण तरतूद- १५५ कोटी रुपये. - दररोज १५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा. - मुकणे धरणातून थेट जलवाहिनी. - जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू, निविदा प्रक्रिया सुरू. -------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Milk Rate Hike : राज्यात दूध विक्री दरात प्रतिलिटर ४ रुपयांची वाढ; १६ नोव्हेंबरपासून नवीन दर लागू

पंतप्रधान मोदींच्या नावाने ऑनलाईन फ्रॉड; एका मेसेजमुळे बँक खातं होऊ शकतं रिकामं, नेमका विषय काय?

NTA Reform: NEET मधील पेपरफुटीनंतर मोठा निर्णय; गैरप्रकार रोखण्यासाठी आता थेट लष्करी अधिकाऱ्यांना...

IND vs NZ: शेवटच्या वनडेत खेळणार नाही मॅट हेन्री, विराट कोहलीने जर्सी भेटही दिली; पण कारण काय?

Latest Marathi News Live Update: दिल्लीत सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या महत्त्वाच्या बैठका

SCROLL FOR NEXT