नाशिक

आगीत नुकसानग्रस्त कुटुंबांना कुणाल दराडे फाउंडेशनचा मदतीचा आधार...! येवल्यात नुकसानग्रस्त शेख कुटुंबाला दीड लाखांची केली आर्थिक मदत

CD
YEO26B27444 येवला : भंगार दुकानाच्या आगीत आजूबाजूच्या कुटुंबाचे नुकसान झाल्याने त्यांना दीड लाखाची मदत करताना युवा नेते कुणाल दराडे व पदाधिकारी. ३६-२ कुणाल दराडे फाउंडेशनचा आगग्रस्त कुटुंबांना आधार ----------- येवल्यात शेख कुटुंबाला दीड लाखांची मदत ----------- सकाळ वृत्तसेवा येवला, ता.१३ : शहरातील शाह कॉलनीत भंगार दुकानाला लागलेल्या आगीत अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानग्रस्त कुटुंबांना कुणाल दराडे फाउंडेशनचे अध्यक्ष, शिवसेनेचे युवा नेते कुणाल दराडे यांनी एक लाख ५१ हजाराची मदत देऊन माणुसकीचे दर्शन घडवले आहे. आगीच्या घटनेनंतर दराडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. नुकसानग्रस्तांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. फाउंडेशनतर्फे शदाब शेख, सोहेल अहमद शेख आणि अकीब मोबीन शेख यांच्या कुटुंबीयांकडे रोख दीड लाख रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली. या मदतीमुळे संकटात सापडलेल्या कुटुंबांना काहीसा दिलासा मिळाला आहे. या मदतीबद्दल शेख कुटुंबीयांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी श्री.दराडे यांचे आभार मानले आहे. संकटग्रस्त कुटुंबांना मदतीचा आधार देऊन सामाजिक बांधिलकी जपत आर्थिक मदत करणे ही माणुसकीची जाणीव असल्याचे या उपक्रमातून दिसून आले. माजी नगरसेवक रिझवान शेख, शहराध्यक्ष विशाल परदेशी, तालुकाध्यक्ष पांडुरंग शेळके, मोबीन बोंबीलवाले, बिलाल शेख आदी उपस्थित होते. आगीच्या घटनेनंतर अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचण्यास एक तास उशिर झाल्याचे नागरिक सांगत असून कर्मचाऱ्यांकडे आवश्यक संरक्षण कीट उपलब्ध नसल्याची बाबही चिंताजनक असल्याचे श्री. दराडे यांनी सांगितले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तीन तासांहून अधिक वेळ लागल्याने परिसरातील घरांना मोठ्या प्रमाणावर झळा पोहोचल्या. अग्निशमन दलाकडे आधुनिक उपकरणे, आवश्यक संरक्षण साहित्य आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने घटनास्थळी पोहोचण्यासाठी सक्षम व्यवस्था असणे गरजेचे आहे. भविष्यात अशा दुर्घटना घडल्यास नुकसान कमीत कमी व्हावे, यासाठी नगरपालिका आणि संबंधित प्रशासनाने गांभीर्याने विचार करून ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही कुणाल दराडे यांनी केली. ------------

IND vs NZ, 4th ODI: विराट, रोहित, श्रेयस यांना पहिल्याच ओव्हरमध्ये कसं आऊट केलं? मॅट हेन्री म्हणाला, 'हे खूप मजेदार होतं...'

India Export: भारताच्या निर्यातीत 30 टक्क्यांची मोठी झेप; ऑक्टोबरमध्ये 8.47 लाख कोटींची निर्यात, व्यापार तुटीतही घट

'आग ये सुंदरा...तुझा माझा गो शोभल जोडा' आगरी कोळी गाण्यावर ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा धमाकेदार डान्स, नेटकरी म्हणाले...

MPSC गट-क भरती; १६,७१७ पदांसाठी आजपासून भरता येणार अर्ज; आधी फॉर्म भरलेल्यांनाही मिळणार नव्या संवर्गांचा पर्याय

Latest Marathi News Live Update: उदापूर येथे सुपर कॅरी गाडीची दुचाकीला धडक; २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT