Ladki Bahin Yojna esakal
नाशिक

Ladki Bahin Yojna: 'लाडकी बहीण' वाहनाच्या धडकेत ठार; योजनेची कागदपत्रे जमा करण्यासाठी जाताना घडला प्रकार

राज्य शासनानं महिलांसाठी आणलेल्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या राज्यभरातील तहसील कार्यालये आणि सेतू केंद्रांवर मोठी झुंबड उडालेली पहायला मिळत आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

येवला : राज्य शासनानं महिलांसाठी आणलेल्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या राज्यभरातील तहसील कार्यालये आणि सेतू केंद्रांवर मोठी झुंबड उडालेली पहायला मिळत आहे. पण याच दरम्यान एक दुःखद घटना नाशिकच्या येवल्यात घडली आहे. लाडकी बहीण योजनेची कागदपत्रे जमा करण्यासाठी जाताना एका महिलेला वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला आहे. त्यामुळं हळहळ व्यक्त केली जात आहे. (Ladki Bahin Yojna Nashik Yeola women death in accident while going to submit scheme documents)

उज्वला चौधरी (रा. रेल्वे स्टेशन, येवला) या महिलेला तहसील कार्यालयाच्या गेटवर नगर-मनमाड महामार्गावर एका अज्ञात वाहनानं धडक दिली. या धडकेत महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ती जागीच ठार झाली. चौधरी यांचा महिलेचा मृतदेह शविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी आणण्यात आला असून पुढील तपास येवला शहर पोलीस करत आहेत.

दरम्यान, मध्य प्रदेश सरकारच्या 'लाडली बहन' योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनानं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर सुरुवातीला या योजनेचा लाभ घेण्यासाठी १५ जुलै पर्यंत नोंदणी करण्याचं आवाहन सरकारनं महिलांना केलं होतं.

पण मुदत खूपच कमी असल्यानं तहसील कार्यालये आणि सेतू कार्यालयांवर महिला वर्गाची मोठी झुंबड उडाली होती. यातून काही तलाठ्यांनी या महिलांकडून अर्जासाठी पैसे उकळल्याचे प्रकारही घडले आहेत. तसंच काही महिलांनी या योजनेची मुदत वाढवण्याची आणि काही अटीशर्ती शिथील करण्याची मागणी केली होती. या मागण्यांनुसार, आता या योजनेची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. तर मूळ योजनेत आता अनेक बदल करण्यात आले आहेत.

असे आहेत नवे नियम

यामध्ये वयोमर्यादा ६० वरुन ६५ वर्षे करण्यात आली आहे. तर एकाच घरातील केवळ दोन महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल. तसंच कुटुंबाचं २ लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या महिलाच यासाठी पात्र आहेत. त्याचबरोबर ज्या महिलांकडं पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्यांना उत्पन्नाचा दाखला देण्याची गरज नसल्याचंही नव्या नियमावलीत स्पष्ट करण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, १४ जिल्ह्यांत जोरदार बरसणार; ४८ तास धोक्याचे

Latest Marathi News Updates: आयुष कोमकर हत्या प्रकरणी आंदेकर कुटुंबातील आणखी चौघांना अटक

Pune Theatre Festival : नाट्यप्रेमींसाठी तीन दर्जेदार नाटकांची पर्वणी; ‘सकाळ’तर्फे येत्या आठवड्यात नाट्य महोत्सवाचे आयोजन

Gondia News: देवरी एमआयडीसीतील सुफलाम कंपनीत भीषण अपघात; मशीनमध्ये अडकून मजुराचा होरपळून मृत्यू

TET Exam Date : टीईटी परीक्षेची तारीख ठरली, परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज व परीक्षा शुल्क 'या' तारखेपासून भरता येणार

SCROLL FOR NEXT