Sanjay Raut News 
नाशिक

Lalit Patil Drugs Case: शिवसेनेचं सरकार पाडण्यासाठी ड्रग्ज माफियांकडून किती पैसे मिळाले?; संजय राऊतांचा सवाल

ड्रग्ज विरोधात संजय राऊत यांनी नाशिक इथं पदयात्रा केली तसेच सभा घेतली.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नाशिक : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणामुळं सध्या महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. यापार्श्वभूमीवर विरोधक आक्रमक झाले आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं तर सरकारला यावरुन चांगलचं धारेवर धरलं आहे.

याबाबत नाशिकमध्ये आज संजय राऊत यांची पदयात्रा आणि सभा झाली. यावेळी त्यांनी शिवसेनेचं सरकार पाडण्यासाठी ड्रग्ज माफियांकडून किती पैसे घेतले? असा सवाल विचारत त्यांनी भाजपला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. (Lalit Patil Drugs Case how much money was received from drug mafia to topple Shivsena govt Sanjay Raut)

सरकार पाडण्यासाठी किती पैसे मिळाले?

राऊत म्हणाले, "गुजरातमध्ये लाखो-कोट्यवधी रुपयांचं ड्रग्ज पकडलं जातं पण जो माल पकडला जात नाही तो नाशिकपर्यंत पोहोचतो. याला कोण जबाबदार आहे? तुमच्या हातात पोलीस यंत्रणा आहे. विचारा तुमच्या दोन मंत्र्यांना आत्तापर्यंत या ड्रग्जच्या व्यापारातून किती खोके सरकारमधील मंत्र्यांना मिळाले आहेत. शिवसेनेचं सरकार पाडण्यासाठी या ड्रग्ज माफियांकडून किती पैसा तुम्हाला मिळाला हा प्रश्न आहे?" (Latest Marathi News)

पोलिसांवर हल्ले कसे होतात?

आपल्याला ड्रग्ज माफिया आणि या ड्रग्ज रॅकेटच्या मुळापर्यंत जायचं आहे. नाशिकला आपल्याला वाचवायचं आहे. एक तरुण पिढी इथली उद्ध्वस्त होताना आम्ही पाहू शकत नाही. फडणवीसांच्या नागपूरच्या बंगल्याबाहेर एका पोलीस उपायुक्तांना कॉलर पकडून मारलं जातं! हाच तुमचा वचक आहे का? पोलिसांवर हल्ले कसे काय होत आहेत? असा सवालही यावेळी राऊत यांनी केला. (Marathi Tajya Batmya)

धमक्या कोणाला देता?

नाशिकमध्ये नशेचा कोट्यवधींचा व्यापार आणि व्यवहार सुरु आहे. वेळ आलेली आहे की, या सर्वांना रामकुंडात बुडवा जर बुडवता येत नसेल तर तुडवा. आमचं आवाहन आहे या सरकारला या अंगावर आम्ही शिंगावर घ्यायला तयार आहोत.

काय करणार आहात तुम्ही? फडणवीस धमक्या देताय का? अटक करताय? करा. एकदा तुरुंगात जाऊन आलो आहे परत जाईन या महाराष्ट्रासाठी. हे नाशिक ड्रग्जमुक्त केल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही. आज रस्त्यावर उतरलो आहोत, उद्या नाशिक बंद केल्याशिवाय राहणार नाही. मंत्र्यांच्या गाड्या इथं कशा फिरतात ते बघतोच आम्ही, अशा शब्दांत संजय राऊत यांनी इशारा दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian student shot in USA : अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या!

Rohit Sharma: 'अद्भूत कर्णधार, टीम इंडियाला तू शिकवलंस की...' दिनेश कार्तिकचा रोहितच्या नेतृत्वाला सलाम; पाहा Video

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राच्या वैष्णवी अडकरने जिंकले विजेतेपद; मनिष सुरेशकुमार पुरुष विभागात विजेता

सातारा अन् पालघर जिल्ह्यातील दोन न्यायाधीश सेवेतून बडतर्फ; नेमकं प्रकरण काय?

Phulambri Protest : शेतकऱ्यांच्या मदतीवरून काँग्रेस आक्रमक तहसीलदार व काँग्रेस कार्यकर्त्यांत बाचाबाची

SCROLL FOR NEXT