lasalgaon market esakal
नाशिक

लासलगाव बाजार समितीने घेतला 'हा' ऐतिहासिक निर्णय

अरूण खंगाळ,लासलगाव

लासलगाव (जि.नाशिक) : कांदा म्हटले की, चटकन तोंडात नाव येते ते लासलगावचे. मग ते गल्लीपासून दिल्लीपर्यंत असो. शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारतर्फे प्रत्येक राज्यांमध्ये बाजार समितीची राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली स्थापना करण्यात आली. आशिया खंडातील कांद्याची प्रसिद्ध असलेली बाजारपेठ लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (lasalgaon market committee) ७५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच बदल केला आहे. (lasalgaon-market-committee-took-historic-decision-nashik-marathi-news)

ऐतिहासिक निर्णय; ७५ वर्षांच्या परंपरेला फाटा

१ एप्रिल १९४७ मध्ये लासलगाव बाजार समितीची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून आजपर्यंत ७५ वर्षांपासून एक परंपरा अवलंबली जात होती. ती म्हणजे दर महिन्याच्या अमावस्येला कांदा व धान्याचे लिलाव बंद ठेवण्याची. ही परंपरा का आणि कशासाठी अवलंबली जात होती याचे कोणाजवळही उत्तर नव्हते. परंपरेचे काटेकोरपणे पालन लासलगाव बाजार समितीच्या प्रशासनाकडून केले जात होते. या प्रचलित परंपरेला आता फाटा देत दर अमावस्येला सकाळच्या सत्रात कांद्याचे लिलाव सुरू करण्यात आले आहे. शनिवारी एका सत्रात सुरू असलेले कांद्याचे लिलावही दर शनिवारी दोन्ही सत्रात सुरू करण्यात आले आहेत. आशिया खंडातील कांद्याची प्रसिद्ध असलेली बाजारपेठ लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ७५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच बदल करत अमावस्येच्या दिवशीही आता कांद्याचे लिलाव सकाळच्या सत्रात सुरू ठेवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आल्याची माहिती सभापती सुवर्णा जगताप आणि लासलगाव व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नंदकुमार डागा यांनी दिली.

लिलाव बंद ठेवण्याचे हे कारण

नाशिक जिल्ह्यातील निफाड आणि चांदवड तालुक्यातील गावांमधील शेतकऱ्यांची शेतीमाल विक्रीसाठी लासलगाव बाजार समितीची स्थापना करत शेतकऱ्यांना शेतीमाल विक्री करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. आधुनिक वाहनांची उपलब्धता नसल्याने बैलगाड्यांमधून कांदा व धान्य विक्रीसाठी येत असे. महिन्याच्या दर अमावस्येला आपल्यावर काही संकट येऊ नये म्हणून व्यापारी, शेतकरी आणि हमाल, मापारी हे बाजार समितीच्या आवारातील कांदा व धान्य लिलावाच्या कामकाजात सहभागी होत नसल्याने कांद्याचे व धान्य लिलाव बंद ठेवले जात असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Recruitment 2026: भरतीत दोन अभ्यासक्रमांतील उमेदवारांना डावलले! ;कन्स्ट्रक्शन सुपरवायझर,आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समनधारकांची पात्रतेची मागणी

Gokul Dairy : गोकुळचा २४ कोटींहून अधिक रुपयांचा तोटा भरून काढण्याचे आव्हान; चारा-पाण्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार राजेश पाटील

Latest Marathi News Live Update : अजित पवार यांच्या पुतळ्याचे सोमवारी अमित शहा यांच्या हस्ते अनावरण

IAS Office : कर्नाटकातील केपीएससी भरती घोटाळा पुन्हा चर्चेत; ईडीने दाखल केले १,५०० पानी आरोपपत्र दाखल.

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तीव्र; महाराष्ट्रातील थंडी कमी होणार? राज्यात पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT