lawyers panel Interviews Municipal Corporation for Advocates Panel high court nashik sakal
नाशिक

नाशिक : वकील पॅनलसाठी महापालिकेकडून मुलाखती

उच्च न्यायालयात बाजू मांडण्यासाठी २३ वकिलांचे अर्ज

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सर्वोच्च, उच्च व स्थानिक न्यायालयामध्ये महापालिकेचे खटले लढविण्यासाठी वकील पॅनलची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ८७ वकिलांनी महापालिकेकडे अर्ज केले असून, यात उच्च न्यायालयात महापालिकेची बाजू मांडण्यासाठी २३ वकिलांनी अर्ज केले आहे. जिल्हा न्यायालयात वकिलांना नियुक्ती करण्यासाठी शुक्रवार (ता. ४) पासून मुलाखत प्रक्रिया सुरू झाली. त्यात पहिल्या दिवशी ३२ वकिलांनी मुलाखत दिली.

सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, स्थानिक न्यायालयात तसेच कामगार न्यायालयात महापालिकेचे बाजू मांडण्यासाठी वकील नियुक्त केली जातात. महापालिकेत सध्या २७ वकील कार्यरत आहे. यामध्ये जिल्हा न्यायालयात १७ उच्च न्यायालयात आठ व सर्वोच्च न्यायालयात दोन वकील काम पाहतात. वकिलांना महापालिकेकडून फी अदा केली जाते. वकिलांची फौज उभी करूनही महापालिकेच्या विरोधात निकाल जात असल्याचे प्रकार गेल्या काही वर्षात वाढले आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी वकील पॅनलची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी जाहिरात काढण्यात आली. जिल्हा न्यायालय व कामगार न्यायालयासाठी २७ वकिलांनी अर्ज केले होते.

उच्च न्यायालयासाठी आठ वकिलांनी अर्ज केले होते. जिल्हा न्यायालयात वकील पॅनलची नियुक्ती करण्यासाठी मुलाखती सुरू झाल्या. महापालिका आयुक्त कैलास जाधव, प्रशासन उपायुक्त मनोज पाटील, विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी ३२ मुलाखती घेतल्या. उच्च न्यायालयासाठी १० मार्चला मुलाखत होणार आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chief Justice India: सरन्यायाधिशांचे वादग्रस्त वक्तव्य अन् सारवासारव..

Devendra Fadnavis: कर्करोग उपचार खर्च कमी होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्यात पीपीपी तत्त्वावर नवे मेडिकल सेंटर सुरू!

बुंडिबुग्यो व्हायरस, इबोलाच्या साथीचा उद्रेक; ८८ जणांच्या मृत्यूनंतर WHOने जाहीर केली ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी

Anand Paranjpe Sharad Pawar Meeting : पक्ष प्रवेश एकनाथ शिंदेंच्या पक्षात, भेट घेतली शरद पवारांची; ठाणेकर आनंद परांजपेंच्या भेटीने चर्चांणा उधाण

'सिंगल फादर असल्यानं मुलीच्या मैत्रिणी घरी येत नाही' इमरान खान म्हणाला, 'त्यांच्या आई वडिलांना माझ्याकडे मुलींना पाठवायला भिती...'

SCROLL FOR NEXT