dog-village.jpg
dog-village.jpg 
नाशिक

थरारक! कुत्रा का भुंकतोय म्हणून 'ते' पळतच घराबाहेर आले...अन् समोर

सकाळवृत्तसेवा

नाशिक/ओझर : अंतरवेली(ता निफाड ) रात्रीची वेळ कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज आला म्हणून सगळे बाहेर येऊन बघता तर काय? कुत्र्याचे असे हाल रक्त बंबाळ अवस्थेत कुत्रा त्याच्याकडे...त्याचा असा मुक्त संचार की भल्या भल्याच्या अंगावर काटा येईल. ही घटना घडली पिंपळगांव जऊळके खेडगांव शिवरस्त्यावरील अत्तारपट्टी शिवारात...अन् सगळ्यांचाच उडाला थरकाप...

अशी आहे घटना

बाळासाहेब महाले यांच्या मळ्यात शुक्रवारी (ता. 1) रात्री बिबट्याने त्यांच्या कुत्र्यावर हल्ला चढून डोळ्यादेखत ओढत नेऊन फस्त केले. कुत्राच्या जोराजोरात भुंकण्याचा आवाज आल्याने समजा सगळा प्रकार. परिसरातील शेतकऱ्यांनी वन विभागाकडे तक्रार केल्यानंतर पिंजरा लावण्यात आला आहे. मात्र बिबट्या हुलकावणी देऊन कुत्र्यांचाच फडशा पाडत आहे. वीजमंडळाने भारनियमन केल्याने थ्री फेज पुरवठयात रात्रीच्या वेळी पिकांना पाणी भरावे लागते. मात्र सध्या भाजीपाला पिकांना उन्हाळ्यात जगवण्यासाठी रात्रीची भरणी शेतकऱ्यांना महागात पडत आहे. त्यामुळे चोवीस तास किंवा दिवसा थ्री फेज विद्युत पुरवठा करावा अशी मागणी अंतरवेलीचे माजी सरपंच हिरामण महाले यांच्यासह नागरिकांनी केली आहे. 

कुत्रे का भुंकले म्हणून पाहत असतांना बिबटया कुत्रे ओढून घेऊन जात असतांना दिसला. त्यामुळे वस्तीवर सर्वच रहीवाशी दहशतीखाली आहेत. पिकांना पाणी देण्यासाठी चोवीस तास किंवा दिवसा थ्री फेज विज दयावी. - बाळासाहेब महाले,  अत्तारपट्टी शिवारमळा, अंतरवेली 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT