leopard esakal
नाशिक

नाशिक : फुलेनगर येथे बिबट्या जेरबंद

अजित देसाई

सिन्नर (जि. नाशिक) : तालुक्यातील वावीजवळच्या फुलेनगर (माळवाडी) शिवारात गेल्या अनेक महिन्यांपासून वास्तव्यास असलेला बिबट्या (Leopard) शुक्रवारी (ता. २७) पहाटे वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद (Trapped) झाला. (Leopard caught at Phulenagar Nashik News)

आठ दिवसांपूर्वी फुलेनगरला बिबट्या विहिरीत पडल्याची घटना घडली होती. सुमारे तासभर प्रयत्न केल्यावर हा बिबट्या स्वतःच विहिरीबाहेर पडला होता. तेव्हापासून वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला होता. दोन दिवसांपूर्वी थोरात वस्ती परिसरात वसंत पठाडे यांच्या घरासमोर बांधलेल्या वासराला हल्ला करून बिबट्याने जखमी केले होते. त्यामुळे पिंजऱ्याची जागा बदलून पठाडे यांच्या चिकूच्या बागेत सापळा रचला होता. शुक्रवारी मध्यरात्री या पिंजऱ्यात बिबट्या अडकला. सकाळी सातच्या सुमारास पठाडे पिंजऱ्याकडे गेले असता, हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तातडीने आजूबाजूच्या शेतकऱ्यांना तसेच वन विभागाला माहिती दिली. सकाळी दहाच्या सुमारास वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी फुलेनगरला येत बिबट्याला मोहदरी येथील वन उद्यानात हलविले. बिबट्या दोन ते अडीच वर्षे वयाचा नर असल्याचे वन कर्मचाऱ्यांनी सांगितले.

सकाळी पुन्हा बिबट्याचे दर्शन

फुलेनगर परिसरात एकीकडे बिबट्या अडकल्याची घटना घडली, तर दुसरीकडे त्याचवेळी पाझर तलाव परिसरात एका शेततळ्याजवळ बिबट्याने दर्शन दिले. त्यामुळे परिसरात एकापेक्षा अधिक बिबट्यांचा वावर असल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे. वन विभागाने पुन्हा या भागात पिंजरा लावण्याची मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market AI Rules: शेअर बाजारात AI च्या मदतीने ट्रेडिंग करताय? थांबा! गुंतवणुकीबाबत SEBIचा मोठा इशारा; जाणून घ्या नवे नियम

Koyna Dam Water level Update : महाबळेश्वर, नवजा अन् कोयनेत दमदार हजेरी; गेल्या 12 तासांत 'इतक्या' मिमी पावसाची नोंद, धरणाची स्थिती काय?

Latest Marathi News Live Update : उत्तराखंडमध्ये पावसाचा तडाखा; बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळून महाराष्ट्रातील भाविक अडकले

'वॉर्नरलाही जेजुरीचा भंडारा लावला होता' देवदत्त नागेने सांगितला परदेशातील भन्नाट किस्सा

Kolhapur ACB Trap : शाहूवाडीत PWD च्या शाखा अभियंत्याला 38 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; 'या' कामाच्या बिलासाठी मागितली होती रक्कम

SCROLL FOR NEXT