vishwas-nangre-patil-nashik_.jpg 
नाशिक

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसकडून विश्वास नांगरे पाटलांना पत्र...पत्रात म्हटलयं की... 

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी गर्दीची ठिकाणे टाळावीत असे आवाहन केले जात असताना, शहरात मात्र चोरी-छुप्यारितीने अवैध धंदे सुरू असल्याने त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते आहे. सदरचे अवैध धंदे तातडीने बंद करून कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने केली आहे. शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी पोलीस आयुक्त विश्वास नागरे-पाटील यांना ई-मेलद्वारे पत्र पाठविले आहे. 

कारवाईसाठी युवक राष्ट्रवादीचे पोलीस आयुक्तांना ई-मेलद्वारे पत्र 
पोलिस आयुक्तांना ई-मेलद्वारे पाठविलेल्या निवेदनानुसार, शहरात अवैध धंद्याचे प्रमाण कमी झाले आहे. परंतु अजूनही शहरातील उपनगरीय कानाकोपऱ्यात चोरी-छुप्या पद्धतीने अवैध धंदे सुरु आहेत. त्यामुळे त्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते आहे. नाशिकमध्ये अद्याप कोरोना विषाणूबाधित रुग्ण आढळून आलेला नाही, ही बाब समाधानकारक असली तरी, कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव नाशिकमध्ये होऊ नये, यासाठी जिल्हा व आरोग्य प्रशासनाच्या माध्यमातून अनेक उपाययोजनांची अंमलबजावणी होते आहे.

अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी

नाशिककरांच्या हिताकरिता खबरदारी म्हणून नाशिक शहरातील सर्व मॉल, सिनेमागृह व गर्दी होईल असे ठिकाण बंद करण्यात आलेली आहेत. परंतु शहरातील छुप्या पद्धतीने सुरु असलेल्या अवैध धंद्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. या ठिकाणी येणाऱ्या व्यक्तींची आरोग्यविषयक काळजी घेतली जात नसल्याने कोरोना विषाणू पसरण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. नाशिककरांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोरोनाला रोखणे आवश्‍यक असल्याने शहरात चोरीछुप्या रितीने सुरु असलेले अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी या पत्रान्वये केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL, Video: CSK विरुद्ध RCB चा सामना विराट कोहलीला सर्वात जास्त का आवडतो? म्हणाला, 'त्यांचे फॅन्स बंगळुरूत....'

Solapur : काँग्रेससह शरद पवारांना धक्का; भगीरथ भालके, अनिल सावंत शिवसेनेच्या वाटेवर; DyCM शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेशाची शक्यता

सत्ताधारी पक्षाचा नेता तरुणीसोबत नको त्या अवस्थेत; सापडताच कुठे पळू झालं? शेतातून....

Solapur Ambedkar Jayanti: बुद्धिजीवी भीमप्रेमींना साेलापूरात हवीय एकत्रित मिरवणूक; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव, मध्यवर्तीचा बुधवारी होणार निर्णय!

Latest Marathi News Live Update : टोलानी कॉलेजमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू, इतर विद्यार्थी आक्रमक; प्राचार्याच्या निलंबनाची मागणी

SCROLL FOR NEXT