Taliram arrested in liquor parcel operation at dhabas. including Excise Squad esakal
नाशिक

Nashik Crime: ढाब्यावर दारू ‘पार्सल’; एक्साईजकडून कारवाई

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : हॉटेल, ढाबे आणि खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर दारूचे पार्सल घेऊन बसणाऱ्या तळीरामांविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून धडक कारवाई हाती घेण्यात आली आहे.

महात्मा गांधी सप्ताहाच्या पार्श्वभूमिवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही धडक मोहीम हाती घेतली असून या सप्ताहाच्या पूर्वसंध्येस पथकाने महामार्गावरील ढाबे पायदळी तुडवत नऊ तळीरामांसह दोन ढाबे व्यावसायिकांवर दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल केले आहेत.

या कारवाईत सुमारे साडे तीन हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. (Liquor parcel service at dhaba Action by Excise Nashik Crime)

राज्यभरात २ ते ८ ऑक्टोबर दरम्यान राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह पाळला जाणार आहे. या पार्श्वभूमिवर नाशिक एक्साईज विभागही कामाला लागला आहे.

अधिक्षक शशिकांत गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली बेकायदा मद्याची निर्मिती, वाहतूक आणि विक्री रोखण्यासाठी उपाययोजनांचे नियोजन करण्यात आले आहे.

या काळात मिशन गावठी दारू तसेच हॉटेल, ढाबे आणि खाद्य पदार्थांच्या गाड्यांवर मद्यपान करणाऱ्या तळीरामांना लक्ष केले आहे. जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात पथके रात्रदिवंस तैनात करण्यात आले असून गावपातळीवरील व वाड्या पाड्यांवरील हातभट्या उद्ध्वस्त केल्या जात आहे.

ब विभाग भरारी पथकाने शनिवारी (ता.३०) तळीराम शोध मोहीम हाती घेतली असून पहिल्याच दिवशी महामार्गावरील वाडिवर्हे ते विल्होळी दरम्यानच्या ढाब्यांमध्ये छापा सत्र राबविले. या कारवाईत ९ तळीराम आणि त्यांना बेकायदा सुविधा पुरविणारे दोन ढाबा व्यावसायीक पथकांचे हाती लागले आहेत.

संशयितांच्या ताब्यातून सुमारे ३ हजार ५२० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई निरीक्षक सुनील देशमुख व निरीक्षक योगेश साईखेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक पी.बी. ठाकूर, धिरज जाधव, सहाय्यक दुय्यम निरीक्षक विष्णू सानप, संतोष कडलग, अमित गांगुर्डे, दुर्गादास बावस्कर, चालक राकेश पगारे, वीरेंद्र वाघ आदींच्या पथकाने केली.

"ढाबा, हॉटेल व उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांवर आणि त्यांना सुविधा पुरविणाऱ्या व्यावसायिकांवर धडक कारवाई सुरू आहे. नागरिकांनी मद्यपानासाठी परवाना कक्षातच जावे."

- शशिकांत गर्जे, अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT