LLB Admission esakal
नाशिक

LLB CET Exam : एलएलबी प्रवेशासाठी सीईटीची अर्ज प्रक्रिया सुरू; 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : विधी शाखेतील एलएलबी (LLB) या पदवी अभ्यासक्रमास शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये सीईटी परीक्षेच्‍या माध्यमातून प्रवेश दिला जाणार आहे. या परीक्षेला प्रविष्ट होण्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे. (LLB CET exam Application process of CET for LLB admission open till 14 march nashik news)

पाच वर्षे कालावधीच्‍या एलएलबीच्‍या अर्जासाठी १४ मार्चपर्यंत मुदत दिलेली आहे. इयत्ता बारावीच्‍या पात्रतेच्‍या आधारावर पाच वर्षे कालावधीच्‍या एलएलबी अभ्यासक्रमास प्रवेश घेता येतो. सीईटी सेलतर्फे यासंदर्भात वेळापत्रक जारी केले आहे.

त्‍यानुसार यापूर्वी ११ मार्चपर्यंत नोंदणीची मुदत दिली होती. परंतु वेळापत्रकात बदल करण्यात आले असून, सुधारित वेळापत्रकानुसार १४ मार्चपर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणी करून कागदपत्र पडताळणी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

दरम्‍यान पदवीधारक विद्यार्थ्यांसाठी विधी शाखेत ३ वर्षे कालावधीचा एलएलबी अभ्यासक्रमाचा पर्याय उपलब्‍ध असून, या अभ्यासक्रमाच्‍या वेळापत्रकाची अद्यापपर्यंत घोषणा करण्यात आलेली नाही. येत्‍या काही दिवसांत या अभ्यासक्रमाच्‍या परीक्षा अर्जाबाबत घोषणा होण्याची शक्‍यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TET चा पेपर नेमका कसा फुटला? भिवंडीत काय घडलं? परीक्षा अचानक रद्द; राज्य परीक्षा परिषदेचं पत्र आलं समोर

What is Gautam Adani Startup Initiative? फक्त मोठ्या शहरातच नाही, आता खेड्यापाड्यातील उद्योजकांनाही मिळणार अदानींचा पाठिंबा; काय आहे 'वंदे भारतम्' उपक्रम?

Latest Marathi News Live Update : शिक्षकांच्या TET परीक्षेचा पेपर लीक करणाऱ्या टोळी विरोधात भिवंडीत कारवाई

आधी NEET अन् आता TET; महाराष्ट्रात पुन्हा पेपरफुटीचं ग्रहण, ठाण्यात पेपर लीक झाल्याने परीक्षा रद्द, लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य पुन्हा टांगणीला

Bank News: 30 जूननंतर जुन्या ₹10, ₹20, ₹50 आणि ₹100 च्या नोटा बंद होणार? बँक ऑफ महाराष्ट्र ने दिले मोठे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT