nashik
nashik  esakal
नाशिक

नाशिकमध्ये लॉकडाउनचे निर्बंध शिथिल; जाणून घ्या काय सुरू काय बंद?

विनोद बेदरकर

नाशिक : ब्रेक दि चेनचे आदेश १५ जूनपासून सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार १५ जूनच्या सकाळी ७ पर्यंत निर्बंध कमी करण्यात आले आहेत. त्यानुसार रेड झोनमध्ये नसलेल्या नाशिक जिल्ह्यात हॉटेल, मिठाई, शाळा, लॉन्स, सिनेमागृह वगळता इतर सगळी दुकान सकाळी ७ दुपारी २ पर्यत दुकान खुली ठेवता येणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होउन त्यात, नाशिक जिल्हा रेड झोन बाहेर असल्याने उद्या मंगळवार (ता.१) जूनपासून लॉकडाउनचे निर्बंध शिथील करण्याचा निर्णय झाला. जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, पोलिस आयुक्त दीपक पांडे आदीसह विविध विभागाचे आधिकारी उपस्थित होते.



रेड झोन बाहेर

पॉझिटीव्हीटी दर १० टक्के किंवा त्यापेक्षा कमी असेल आणि उपलब्ध ऑक्सिजन बेड्स ४० टक्क्यांपेक्षा असल्याने नाशिक जिल्ह्यात निर्बंध शिथिल करण्यात येणार आहे. त्यात, आवश्यक वस्तू व सेवांची दुकाने जी सकाळी ७ ते ११ या वेळे ऐवजी सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरु ठेवता येतील. दुपारी ३ नंतर मात्र वैद्यकीय किंवा इतर आणीबाणीच्या प्रसंगांव्यतिरिक्त येण्याजाण्यावर निर्बंध असतील कोरोनाविषयक कामे करणाऱ्या कार्यालयांव्यतिरिक्त इतर सर्व शासकीय कार्यालये ही २५ टक्के कर्मचारी उपस्थितीनिशी सुरु राहतील. संबंधित विभाग प्रमुखास यापेक्षाही जादा उपस्थिती हवी असेल तर संबंधित आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी त्यास परवानगी घ्यावी लागणार आहे. कृषि-विषयक दुकाने आठवड्याच्या कामाच्या दिवसांना दुपारी २ पर्यंत सुरु राहू शकतील. येणारा पावसाळा व पेरणीच्या तयारीसाठी दुकानांच्या वेळा वाढविता येणार आहे.

  • केशकर्तनालय, मेन्स पार्लर उघडण्यास मुभा पण सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेतच. पण, दुकानदारांना फेस शिल्ड आणि मास्क वापरणे बंधनकारक असेल

  • मॉल्स बंद राहतील

  • किरकोळ भाजी मार्केट सकाळई १० ते दुपारी २ सुरू राहिल

  • दूध विक्री यापूर्वीप्रमाणेच दिलेल्या वेळेत सुरू राहिल

  • रेशन दुकाने सरकारी वेळेतच सुरू राहतील.

  • शिवभोजन थाळी १० ते १२ या वेळेत पार्सलसाठी सुरू होती. ती आता १० ते २ या वेळेत सुरू असेल

  • अंत्यविधीसाठी २० व्यक्तींना दशक्रीया विधीसाठी १५ व्यक्तींना परवानगी असेल

  • ई कॉमर्स पद्धतीने घरपोच सेवेला परवानगी असेल

  • दुपारी ३ ते सकाळी ६ या वेळेत नागरिकाना सार्वजनिक ठिकाणी फिरण्यान मनाई असेल

  • अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींना सोबत ओळखपत्र बाळगणे बंधनकारक असेल

  • दुपारी ३ नंतर पोलिस कारवाई करतील याची नागरिकांनी नोद घ्यावी

  • सर्व शासकीय कार्यालयांमध्ये २५ टक्के उपस्थिती राहिल

  • कृषी विषयक दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळेत सुरु राहतील

  • हॉटेल्स, रेस्टॉरंट, मिठाई दुकाने यांना केवळ होम डिलेव्हरीला परवानगी असेल

  • अन्न पदार्थ पार्सल सुविधेसाठी सकाळी ७ ते १ आणि सायंकाळी ५ ते ८ या वेळेत परवानगी असेल

  • येत्या १५ जूनपर्यंत वीकेंड लॉकडाऊन म्हणजे शनिवारी आणि रविवारी बंद असेल. केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील

  • बँका व पोस्ट ऑफिसचे कामकाज सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेतच असेल

  • मुद्रांक व नोंदणी कार्यालयाचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरु असेल

  • मान्सूनपूर्व सर्व कामे सुरू राहतील

  • जिल्ह्याबाहेर प्रवासासाठी ई पास बंधनकारक असेल

  • १५ जून पर्यंत लग्नसोहळ्यांना परवानगी नाही केवळ कोर्ट मॅरेजला परवानगी

  • रात्री ८ ते सकाळी ६ या वेळेत नाशिक शहरासह जिल्ह्यात नाई कर्फ्यू असेल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT