Officials present at the meeting held in the municipality in the background of Lumpy disease esakal
नाशिक

Lumpy Disease: मोकाट जनावरांमुळे येवल्यात फैलावतोय लम्पी; पशुधन सांभाळण्याचे नगरपरिषदेचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

येवला : लम्पी रोग संसर्गजन्य असून, येवल्यात मोकाट गोवंशमुळे लम्पीचा जास्त फैलाव होत आहे.

शहरात लम्पीबाधित जनावर आढळल्याने गोवंशप्रेमींनी दिलेल्या निवेदनानुसार नगरपालिका प्रशासनाने मोकाट जनावरांचा पशुपालकांनी सांभाळ करावा, असे आवाहन करतानाच कारवाईचा इशाराही दिला आहे. (Lumpy disease spread by loose animals Municipal Council appeal to take care of livestock at yeola nashik)

मुख्याधिकारी किरण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लम्पीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी नगरपालिकेत अधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली.

पशुसंवर्धन विभाग व गोवंशप्रेमींच्या मदतीने याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन स्वच्छता अधिकारी सागर झावरे यांनी दिले.

शहरात मोकाट फिरणाऱ्या जनावरास लम्पी आजार झाल्याची शंका नागरिकांना आहे. याबाबत सोशल मीडियावर मेसेज व्हायरला झाले. गोवंशप्रेमींनी नगरपरिषदेत जाऊन तत्काळ उपाययोजना व्हावी, याचे निवेदन दिले.

त्यामुळे नगरपरिषदेने तत्काळ बैठक बोलावून सर्व पशुपालकांना आपल्या जनावरांना लसीकरण करून सहकार्य करावे व आपल्या शहरात रोगाचा प्रादूर्भाव वाढणार नाही, गाई, गुरे आजारी होताच तत्काळ नजीकच्या पशुवैद्यकाशी संपर्क करावा. त्यांच्या मार्गदर्शनानुसार उपचार करावा, असे आवाहन केले.

जनावर मालकांनी आजाराने ग्रस्त जनावरे मोकाट असल्याची घटना गंभीर असून, यापुढे या प्रकारची कोणतीही बाब न होण्याची काटेकोर दक्षता घ्यावी. लम्पी आजारग्रस्त पशुधन विलगीकरणात ठेवावे.

कोणतेही जनावर शहरात मोकाट सोडू नये. या प्रकारची कोणतीही घटना झाल्याचे निदर्शनास आल्यास, प्राण्यांमधील संक्रमक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियमान्वये संबंधितांवर कारवाई व फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येईल, असेही या वेळी सांगण्यात आले.

दरम्यान, मागील वर्षी निवेदन दिले तेव्हाच पशुसंवर्धन विभाग व नगरपालिका प्रशासनाने कारवाई केली असती, तर हे दिवस आले नसते, अशी भूमिका मांडतानाच नगरपालिकेने ठोस उपाययोजना करून रोगाचा फैलाव होणार नाही याची काळजी घ्यावी, अशी मागणी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश कुर्हे, आनंद शिंदे, मनोज दिवटे आदींनी केली.

त्यावर सागर झावरे यांनी दोन दिवसांत पशुसंवर्धन विभाग व गोवंशप्रेमींच्या मदतीने याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. उपमुख्याधिकारी रोहित पगार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश सोनवणे, भाजपचे शहराध्यक्ष मीननाथ पवार, जिल्हा सरचिटणीस आनंद शिंदे, विणकर प्रकोष्टचे मनोज दिवटे, माजी नगरसेवक प्रमोद सस्कर, बडाअण्णा शिंदे, चेतन धसे, बापू गाडेकर, भूषण भावसार, मयूर लकारे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Medha Kulkarni Hospitalized : भाजप खासदार मेधा कुलकर्णी रूग्णालयात दाखल ; काही दिवस संपर्कात नसणार!

Uddhav Thackeray : दगाबाज रे.. सरकार पॅकेजचे काय झाले? उद्धव ठाकरे यांनी भुम, परंडा, वाशी या भागाचा केला पाहणी दौरा

ट्रेनच्या शौचालयात ‘प्रेम’ व्यक्त करणाऱ्यांनो सावधान! आता कुणाचा नंबर किंवा नाव लिहिलंत तर...; रेल्वे प्रशासनाचा थेट इशारा

पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक चार्जिंग... एसटी पेट्रोल पंप सर्वांसाठी खुले होणार! सुविधा कुठे उपलब्ध असणार?

Vegetable Vendor Wins 11 crore Lottery Video : नशीब असावं तर असं! मित्राच्या पैशाने लॉटरीचं तिकीट खरेदी केलेल्या भाजी विक्रेत्याने जिंकलं तब्बल ११ कोटींचं बक्षीस

SCROLL FOR NEXT