Malegaon: Officials of Malegaon Action Committee giving a statement to Additional Superintendent of Police Aniket Bharti esakal
नाशिक

Nashik News : मच्छिंद्र शिर्केंचा अपघात नसून घातपात; मालेगाव कृती समितीतर्फे चौकशीची मागणी

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : गोरक्षक मच्छिंद्र शिर्के यांचा अपघात झाला नसून त्यांचा घातपात करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करावी. गोरक्षकांना तत्काळ संरक्षण देण्यात यावे अशी मागणी मालेगाव कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अपर पोलिस अधिक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

श्री. शिर्के नाशिकहून मालेगावला येत असताना चांदवड घाटाजवळ पिकअप गाडीमध्ये गोवंश जातीचे १० ते १२ जनावरे असल्याची शंका त्यांना होती. संशय असल्याने गाडीचा पाठलाग करीत असताना मुंगसे गावाजवळ वाहतूकीची कोंडी झाल्याने पिकअप चालकाने सदरील जागेवर वाहन फिरविले.

त्याचवेळी पाठीमागे असलेल्या चारचाकी गाडीने गोरक्षकांच्या गाडीस धडक दिली. त्यानंतर अज्ञात मारेकऱ्यांनी लोखंडी रॉडने हल्ला केला. (Machindra Shirke Case was not an accident but casualty and Demand for inquiry by Malegaon Action Committee Nashik News)

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

सदरचा भाग हा अपघाताचा नसून घातपात करण्याचा प्रकार आहे. तसेच याचदिवशी रात्री ज्वार्डी येथील गोरक्षकांच्या गावी जाऊन समाजकंटकांनी त्यांचे नावे, पत्ते विचारले. त्यांच्यावर पाळत ठेवली जात आहे. त्यामुळे गोरक्षकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तसा प्रकार त्यांच्याशीही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या कामी सखोल चौकशी होऊन गोरक्षक यांना तत्काळ संरक्षण देण्यात यावे. समाजकंटक यांच्या विरुद्ध तत्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मालेगाव कृती समितीचे प्रदीप बच्छाव, सतीश कजवाडकर, रवींद्र दशपुते, हरिप्रसाद गुप्ता, नितीन पोपळे, यशवंत खैरनार, ॲड. विजय भावसार, गोविंदा चौधरी, विवेक वारुळे, अतुल शिरोडे, भावेश भावसार, चिरंजीव सानप आदींनी निवेदनाद्वारे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

योग गुरूचा १७ वर्षीय मुलीसह ८ महिलांवर अत्याचार, अल्पवयीन पीडितेनं दिलेल्या तक्रारीनंतर सगळा प्रकार उघडकीस

Maharashtra Health Alert: राज्यात असंसर्गजन्य आजारांचा धोका; मधुमेह, दमा, स्थूलतेच्या प्रमाणात वाढ

Big Revelation in Tharla Tar Mag: ठरलं तर मग मालिकेत मोठा ट्विस्ट! सायलीच खरी तन्वी! अर्जुनला सत्यासाठी पोहचला थेट बायकोच्या शाळेत

Girish Mahajan : ठाकरे ब्रॅन्ड नामशेष झाला, आगामी निवडणुकीत बॅन्ड वाजणार; गिरीश महाजन यांची घणाघाती टीका

Pimpri News : नागरी सुविधा केंद्राला मुदतवाढ, नव्या निविदा प्रक्रियेपर्यंत अप्पर तहसीलमध्ये सेवांचा पुरवठा सुरूच

SCROLL FOR NEXT