MahaNirmiti Power Generation eSakal
नाशिक

MahaNirmiti : महानिर्मिती वीज कंपनीची विक्रमी कामगिरी! एकूण ६१,४३९ दशलक्ष युनिट्स वीजनिर्मिती; औष्णिक वीजनिर्मितीत वाढ

मागील वर्षाची आकडेवारी पाहिली असता २०२२-२०२३ मध्ये ५७,७३४ दशलक्ष युनिट्स अशी ५.९८ टक्के वाढ तर सन २०२३-२०२४ मध्ये ६१,४३९ दशलक्ष युनिट्स आणि ७.८५ टक्के वाढ झाली आहे, हे विशेष.

सकाळ वृत्तसेवा

Mahanirmiti : ‘महानिर्मिती’ने तांत्रिक आणि वाणिज्यिक बाजूंवर लक्ष केंद्रित करून कार्यक्षम वीज उत्पादनासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केल्याने २०२३-२४ या आर्थिक वर्षात ‘महानिर्मिती’चे वीज उत्पादन ऐतिहासिक ६१,४३९ दशलक्ष युनिट्स इतके झाले आहे.

त्यात भुसावळ ७,५७५.२३५ दशलक्ष युनिट्स, चंद्रपूर १६,२७९.६६९ दशलक्ष युनिट्स, पारस ३,५९५.९८३ दशलक्ष युनिट्स, कोराडी १३,२००.३०१ दशलक्ष युनिट्स, खापरखेडा ८,२६७.४०९ दशलक्ष युनिट्स, नाशिक २,६४७.३७६ दशलक्ष युनिट्स, परळी ४,१०४.२१६ दशलक्ष युनिट्स आणि उरण १,७६९.०३२ दशलक्ष युनिट्स, जलविद्युत प्रकल्प ३,६६७.८३३ दशलक्ष युनिट्स, सौरऊर्जा प्रकल्प ३३२.१०५ दशलक्ष युनिट्स इतकी विजेची निर्मिती केली आहे.

या यशस्वी कामगिरीबाबत महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांनी महानिर्मितीच्या अधिकारी, अभियंता, तंत्रज्ञ, कामगार, कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.

मागील वर्षाची आकडेवारी पाहिली असता २०२२-२०२३ मध्ये ५७,७३४ दशलक्ष युनिट्स अशी ५.९८ टक्के वाढ तर सन २०२३-२०२४ मध्ये ६१,४३९ दशलक्ष युनिट्स आणि ७.८५ टक्के वाढ झाली आहे, हे विशेष.

उपक्रम ठरले गेमचेंजर

महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अनबलगन यांनी त्रिसूत्री आखून दिली. त्यात संचाच्या कार्यक्षमता वाढीसाठी भरपूर प्रयत्न केले. जसे प्रभावी इंधन वापर व व्यवस्थापन, सहाय्यकारी वीजवापर कपात, आर्थिक शिस्त, काटकसर, १० टक्के संचलन सुव्यवस्था खर्चात कपात, देखभाल दुरुस्तीबाबत गुणवत्ता, संचाची उपलब्धता वाढविण्यावर भर, उष्मांक दरात वाढ आदी उपक्रमांतून थेट कार्यकारी अभियंता यांच्याशी सुसंवाद साधून महानिर्मितीच्या सर्व संचांची उपलब्धता वाढण्यास मोठा हातभार लागला.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक, कार्यकारी संचालक यांनी उत्तम नियोजन करून क्षेत्रीय मुख्य अभियंते, उपमुख्य अभियंते, अधीक्षक अभियंते यांच्याशी रोज सकाळी दूरदृश्य प्रणालीद्वारे आभासी बैठका, प्रत्यक्ष वीज केंद्र स्थळी वेळोवेळी दौरे करून आढावा घेतल्याने सूक्ष्म नियोजन यशस्वी झाले.

शाश्वत हरित ऊर्जेत भरीव कामगिरी

महानिर्मितीने या वर्षभरात सुमारे आठ हजार मेगावॉटपेक्षा अधिकच्या नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प कामांचे नियोजन केले असून, त्यात सौरऊर्जा, तरंगता सौरऊर्जा प्रकल्प, पवनऊर्जा, उदंचन जलविद्युत केंद्र, हरित हायड्रोजन प्रकल्पाचा समावेश आहे. या संदर्भात देशातील नामांकित सोलर पॅनल उत्पादक आणि विकासक यांच्यासमवेत नुकतेच कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

वीज केंद्रांची उल्लेखनीय कामगिरी

  • २५० मेगावॉट क्षमतेच्या पारस संच चारमधून सलग २५८ दिवसांपेक्षा जास्त वीजनिर्मिती

  • ५०० मेगावॉट चंद्रपूर संच क्रमांक ८ मधून २३४ दिवस अखंडित वीजनिर्मिती

  • महानिर्मितीच्या सात संचांमधून १०० दिवसांपेक्षा जास्त दिवस अखंडित वीज उत्पादन

  • महानिर्मितीचे सर्वोच्च औष्णिक वीज उत्पादन ८,४६० मेगावॉट

  • २९ जानेवारी २०२४ ला सकाळी ०९.४५ ला १० हजार ४०३ मेगावॉट इतके विक्रमी वीजनिर्मिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT