नाशिक

सोमवारचा कॉलम निमित्त

CD
ॲंकर टुडे पान एकसाठी --------------- लोगो : निमित्त/सचिन जोशी ----- शीर्षक... सहकार-राजकारण.. एकाच नाण्याच्या दोन बाजू! इंट्रो.. ‘सहकारात राजकारण नको’ याला काही अर्थ राहिलेला नाही. ज्या राज्याने सहकाराची शिकवण दिली, त्या महाराष्ट्रातच गेल्या दोन-तीन दशकांत ‘सहकारातून राजकारण’ ही संकल्पना पुढे आली आणि आता अलिकडच्या काळात तर ‘राजकारणाशिवाय सहकार नाही’ असे म्हणण्याची वेळ येऊन ठेपलीय. तिकडे ‘गोकुळ’च्या निवडणुकीनंतर त्या संस्थेवर नेमल्या गेलेल्या संचालकांच्या मुद्यावरून वातावरण तापलेले असताना इकडे जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय कुरघोड्यांची स्पर्धा पाहायला मिळतेय. त्यामुळे सहकार व राजकारण ह्या महाराष्ट्रात तरी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे म्हटले तर वावगे ठरू नये... ---- ‘सहकारात राजकारण नको’, ही आदर्श संकल्पना कधीच बाद झालीय. त्यामुळे आता सहकाराच्या प्रत्येक क्षेत्रात राजकारण्यांपलिकडे दुसरे-तिसरे नाव नसते, ही वस्तुस्थिती आहे. जळगाव जिल्ह्यातच नव्हे, तर महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी ही अवस्था. सध्या जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण ढवळून निघतेय. निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याच्या आधीपासूनच खरेतर बँकेवर संचालक म्हणून जाण्यासाठी इच्छुकांची तयारी सुरू होत असते. सहा महिने आधीपासून वेगवेगळ्या तालुक्यांमधील सोसायट्यांच्या ठरावांपासून ही ‘फिल्डिंग’ लागते. राजकारणातील प्रस्थापितच प्रामुख्याने सहकारात; म्हणजेच जिल्हा बँक, दूध संघात वर्चस्व राखण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावत असतात. तेच चित्र जिल्हा बँक निवडणूक प्रक्रियेतून दिसून येतेय. जिल्ह्यात महाविकास आघाडीतील घटक पक्ष अस्तित्वासाठी संघर्ष करताहेत. २०२४च्या विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला सपाटून मार खावा लागला. त्यातून हे पक्ष सावरलेले नाहीत, उलटपक्षी त्यातील पदाधिकारी-कार्यकर्ते सैरभैर झालेत. त्यातून अनेकांचा गत काळात महायुतीतील पक्षांच्या कळपात प्रवेशही घेऊन झालांय. त्यामुळे जिल्हा बँकेची निवडणूकही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी होण्याची शक्यता फारशी नव्हतीच. उलटपक्षी, महायुतीतील घटक पक्षांमध्येच या निवडणुकीवरून कुरघोडीचे राजकारण तापेल, अशी अपेक्षा होती. ती हे तीनही पक्ष पूर्ण करताना दिसताहेत. बँकेच्या २१ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत तीन जागा आधीच बिनविरोध झाल्यात. मात्र, उर्वरित १८ जागांसाठी लढत होतेय. त्यातही १७ तारखेपर्यंत माघारीची मुदत असल्याने तेव्हा आणखी एखाद-दुसरी जागा बिनविरोध निघू शकते. रिंगणातील चारशोवर उमेदवार नावालाच आहेत. प्रत्यक्षात सोसायटी मतदारसंघ व अन्य जागांच्या एकेक जागेसाठी भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे. महायुतीत या सर्व जागांसाठी समेट झाल्याचा दावा केला जात असला, तरी त्यासाठी जिल्ह्यातील मंत्रीद्वय गिरीश महाजन व गुलाबराव पाटलांना बरीच कसरत करावी लागली. एकेक जागा महायुतीतील प्रत्येकच पक्षाने प्रतिष्ठेची केल्याने नेत्यांची कसोटी लागली. सर्व जागांवर एकमत झाल्याचे सांगितले जात असले तरी, १७ तारखेला चित्र स्पष्ट होणारच आहे. मात्र, सहकारातील या मोठ्या व शेतकऱ्यांच्या बँकेची निवडणूक राजकारण्यांशिवाय होऊच शकत नाही, आणि बँकेतही आम्हीच हवे ही वृत्ती पुन्हा एकदा अधोरेखित झाली. ---- (चौकट) सुमित पाटलांचा अर्ज अन्‌ ‘अदृश्‍य शक्ती’ पाचोऱ्यात आमदार किशोर पाटील यांचा मुलगा सुमित पाटलांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला होता. यामागे ‘अदृश्‍य शक्ती’चा हात असल्याचा आरोप सुरवातीला झाला, त्यासाठी काही दाखलेही देण्यात आले. मंत्री महाजनांनी हा आरोप फेटाळत तांत्रिक कारणास्तव अर्ज अवैध ठरल्याचे सांगत सारवासारव केली. मात्र, पालकमंत्र्यांनी त्याच दिवशी अदृश्‍य शक्तीच सुमित पाटलांचा अर्ज वैध ठरवेल, असे सूचक संकेतही दिले होते. या प्रकारात अर्ज अवैध ठरविण्यासाठी व तो अवैध ठरल्यानंतर प्रकरण अंगाशी येईल, असे जाणताच अर्ज वैध ठरविण्यासाठी ‘अदृश्‍य शक्ती’ची चांगलीच दमछाक झाल्याचे बोलले जात आहे. -----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lek Ladki Yojana 2026 : लाडक्या लेकीच्या खात्यात मिळणार १ लाख १ हजार रुपये! सरकारने अर्जाचे नियम केले सोपे; आता घरबसल्या असा करा अर्ज!

Gadchiroli Transformation : नक्षलवादाचा काळोख संपला! महाराष्ट्राचा 'हा' जिल्हा बनणार देशाची नवी 'स्टील सिटी'; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा!

हातगाडीवर भाजी विकत असतानाच लेक न्यायाधीश झाल्याची बातमी कळाली... आई-वडील भावूक... कधीकाळी परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठीही नव्हते ८०० रुपये!

Marathwada Water Crisis: सरकारच्या दुर्लक्षाने मराठवाड्याचे ७ टीएमसी पाणी अडकले! दोन बोगद्यांची कामे ठप्प, पंपगृहही अपूर्ण; शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्याला ब्रेक

Latest Marathi News Live Update : धुळ्यात क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त 'जनजातीय गौरव दिन' उत्साहात संपन्न

SCROLL FOR NEXT