Teacher Recruitment esakal
नाशिक

Teacher Recruitment : शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा! निवडणूक आयोगाची परवानगी; मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर नियुक्ती

Nashik News : राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे पवित्र संकेतस्थळामार्फत सुरू करण्यात आलेली शिक्षक भरती प्रक्रिया लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे थांबली होती.

सकाळ वृत्तसेवा

बिजोरसे : राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे पवित्र संकेतस्थळामार्फत सुरू करण्यात आलेली शिक्षक भरती प्रक्रिया लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे थांबली होती. मात्र आता निवडणूक आयोगाकडून शिक्षक भरती प्रक्रियेला परवानगी मिळाली असून, पुन्हा भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. (Maharashtra Open way for teacher recruitment Election Commission Appointment news)

पवित्र संकेतस्थळाद्वारे २५ फेब्रुवारी २०२४ ला गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांच्या निवडीसाठी शिफारस असलेली सर्वसाधारण गुणवत्तायादी व्यवस्थापन जाहिरातनिहाय प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करून समुपदेशनाद्वारे नियुक्ती प्रक्रिया त्या-त्या नियुक्ती प्राधिकारी स्तरावर सुरू करण्यात आली होती.

केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्याने आदर्श आचारसंहिता लागू झाली. आचारसंहितेच्या काळात नियुक्तीच्या प्रक्रियेवर निर्बंध आले. या विषयीची तातडीने तसेच न्यायालयीन आदेश विचारात घेता नियुक्ती प्रक्रिया सुरू ठेवण्यास परवानगी मिळण्यासाठी शिक्षण आयुक्त कार्यालयाने शासनामार्फत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव सादर केला होता. (latest marathi news)

या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने नियुक्तीस शिफारस झालेल्या ठिकाणची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियुक्तीबाबतची कार्यवाही करण्यास परवानगी दिली आहे, असे पत्र शिक्षण आयुक्त कार्यालयास १९ एप्रिलला प्राप्त झाले आहे. त्यानुसार नियुक्ती प्राधिकारी यांना कार्यवाही करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली.

"शिक्षक नियुक्ती प्रक्रिया सुरू ठेवण्यास निवडणूक आयोगाची परवानगी मिळाली आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर संबंधित जिल्ह्यातील नियुक्ती संदर्भातील कार्यवाही करण्यात येईल."

- सूरज मांढरे, शिक्षण आयुक्त, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ उद्घाटनाआधीच श्रेयवादाचा वाद; 6 एप्रिलला सोहळा

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

SCROLL FOR NEXT