नाशिक

राज्य वन्यजीव मंडळाची मंजुरी; क्षेत्रफळ, गावांची संख्येबाबत उत्सुकता

CD
वनक्षेत्रांना संवर्धन लाभले, अधिसूचना कधी? राज्य वन्यजीव मंडळाची मंजुरी; क्षेत्रफळ, गावांची संख्येबाबत उत्सुकता सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १५ : जिल्ह्यातील दिंडोरी, सुरगाणा आणि ताहाराबाद या तीन वनक्षेत्रांना संवर्धन राखीव क्षेत्राचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला राज्य वन्यजीव मंडळाने मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली २६ ऑक्टोबरला झालेल्या मंडळाच्या २६ व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यातील सात जिल्ह्यांमधील १४ नवीन संवर्धन राखीव क्षेत्रांच्या प्रस्तावांना या वेळी मान्यता देण्यात आली. मात्र, नाशिकमधील तिन्ही क्षेत्रांचे निश्चित क्षेत्रफळ, त्यात समाविष्ट होणारी गावे आणि अंतिम अधिसूचनेची कालमर्यादा याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. दिंडोरी, सुरगाणा आणि ताहाराबाद या वनक्षेत्रांचा समावेश झाल्याने जिल्ह्यातील जैवविविधता आणि वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासाच्या संरक्षणाला बळ मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, या क्षेत्रांमध्ये नेमक्या कोणत्या वन्यजीवांच्या अधिवासांना संरक्षण मिळणार, याची सविस्तर प्रजातीवार माहिती अद्याप समोर आलेली नाही. संबंधित वनक्षेत्रांचे जैवविविधता सर्वेक्षण, वन्यजीवांची संख्या आणि भ्रमणमार्ग यांचा अभ्यास महत्त्वाचा ठरणार आहे. तिन्ही प्रस्तावित संवर्धन राखीव क्षेत्रांचे स्वतंत्र आणि एकत्रित क्षेत्रफळ किती, किती गावांच्या महसुली अथवा वनहद्दींचा त्यात समावेश होणार आहे. विशेषतः सुरगाणा आणि ताहाराबाद परिसरातील आदिवासी वस्तीच्या पार्श्वभूमीवर स्थानिकांच्या पारंपरिक वनहक्कांबाबतही स्पष्टता आवश्यक आहे, मात्र ही कार्यवाही लवकरात लवकर व्हावी अशी मागणी वनअभ्यासकांनी केली आहे. ---चौकट अंतिम अधिसूचनेकडे लक्ष राज्य वन्यजीव मंडळाची मंजुरी ही अंतिम अधिसूचना नसून पुढील प्रशासकीय प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे वन विभागाकडून प्रस्तावित सीमांकन, गावनिहाय तपशील, जैवविविधता अहवाल आणि स्थानिकांच्या हक्कांबाबतची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. वनसंवर्धनाचा निर्णय प्रत्यक्षात उतरताना स्थानिक समुदायांचा सहभाग आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण याला महत्त्व राहणार आहे. --- कोट वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ मधील कलम ३६ अ नुसार संवर्धन राखीव क्षेत्र घोषित करण्यापूर्वी स्थानिक समुदायांशी सल्लामसलत करणे आवश्यक असून व्यवस्थापन समितीत ग्रामपंचायतींच्या प्रतिनिधींना स्थान आहे, याबाबत धोरण स्पष्ट करण्याची गरज आहे. -विजय केकाण, वनअभ्यासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2027: ब्रेबॉर्न नाही, आता वानखेडेवर रंगणार फायनलसहित ११ सामने! BCCI चा मोठा निर्णय; पाहा खरं कारण काय?

Indian Ocean Geopolitics: हिंदी महासागराचा प्रवास – शांतिकडून संघर्षाकडे

‘नानांना पाठ दाबण्याचे दोन रुपये द्यायचो’; अशोक सराफांनी सांगितला भन्नाट किस्सा! म्हणाले...'भर कार्यक्रमात नानांनी पाठ दाबली'

Latest Marathi News Live Update : धुळ्यात क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त 'जनजातीय गौरव दिन' उत्साहात संपन्न

Lek Ladki Yojana 2026 : लाडक्या लेकीच्या खात्यात मिळणार १ लाख १ हजार रुपये! सरकारने अर्जाचे नियम केले सोपे; आता घरबसल्या असा करा अर्ज!

SCROLL FOR NEXT