Sesame Seeds esakal
नाशिक

Makar Sankranti 2024: यंदा तीळगुळाचे भाव वाढणार! राज्यात झालेल्या अल्पवृष्टीमुळे तिळाच्या उत्पादनात घट

‘तीळगूळ घ्या आणि गोड गोड बोला’, असे एकमेकांना शुभेच्छा देणारा मकर संक्रातीचा सण येत्या आठ दिवसांवर येऊन ठेपला आहे.

विजय पगारे

इगतपुरी : ‘तीळगूळ घ्या आणि गोड गोड बोला’, असे एकमेकांना शुभेच्छा देणारा मकर संक्रातीचा सण येत्या आठ दिवसांवर येऊन ठेपला आहे. यंदा सर्वत्र झालेल्या अल्प व नंतर झालेल्या अवकाळी पावसामुळे तीळाचे उत्पादन घटले आहे.

त्यामुळे तीळाचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे तीळ आणि तिळापासून तयार होणारे पदार्थ महागले आहेत. सध्या तिळाचे भाव किरकोळ बाजारात २२० ते २४० रूपये किलो आहेत, तर गूळही ६० ते ८० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

काही महिन्यांपूर्वी १६० ते १८० रुपये प्रतिकिलोने विकला जाणारी तीळ संक्रातीच्या तोंडावर महागली आहे. त्यामुळे यंदा तीळ-गूळ महागणार आहे. तीळ आतापासूनच विकत घ्यायची का, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. (Makar Sankranti News price of Tilgul will increase this year Sesame production decreased due to lack of rain in state nashik)

मागील काही वर्षांपासून सातत्याने तीळाचा पेरा कमी होत चालला आहे. दहा वर्षांपूर्वी प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतात काही प्रमाणावर तिळाचा पेरा असायचा.

नाशिक जिल्ह्याचा एकट्याचा विचार केला, तर बोटावर मोजण्या एवढ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये तिळाचे पीक आढळून येते. हा पेरा कमी होण्यामागचे ही काही कारणे आहेत.

काही जाणकार शेतकऱ्यांना दिलेल्या माहितीनुसार, पूर्वी तीळ मोठ्या प्रमाणावर पिकविली जात होती. तेव्हा रासायनिक फवारण्याचा, औषधींचा वापर केला जात नव्हता.

त्यामुळे उत्पादनही तशाच पद्धतीने निघायचे. हल्ली कीटनाशक व खराब बियाण्यांचा तीळ शेतीला फटका बसत आहे. कुणी तिळाचा पेरा केला, तर शेजारील शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात तणनाशक औषधाची फवारणी केली, तर त्याचा परिणाम तीळाचा शेतीवर होतो.

वातावरणातील सततच्या बदलांमुळे शेतकरी तीळ पिकाकडे दुर्लक्ष करताना दिसतात. लागवड क्षेत्र कमी असल्यामुळे भाववाढ होते. जिल्ह्यात उत्पादन कमी असल्यामुळे व्यापारी गुजरातमधून तीळ आणि तिळाचे पदार्थ मागवितात.

गुजरातमध्ये तिळाचे उत्पादन जास्त घेतले जाते. तसेच कृषी विभागाकडूनही शेतकऱ्यांना तीळ लागवडीसाठी आवाहन केले जाते. मात्र, चांगल्या प्रमाणात उत्पादन निघत नसल्यामुळे त्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे.

ही परिस्थिती अशीच कायम राहिली, तर येणाऱ्या काळामध्ये एक तीळ सात जणांना खाण्याची वेळ येणार का? तिळाचे पदार्थ आपल्या आहारातून हद्दपार होण्याच्या धोका आहे.

तीळ आरोग्यासाठी फायदेशीर असल्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. त्याचे वाढते दर मात्र सर्वसामान्यांच्या खिशाला झळ पोहोचविणारे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monorail Breakdown Update : चेंबूरमध्ये मोनोरेलमध्ये बिघाड, ३०० हून अधिक प्रवाशांची सुटका, ६ जणांना त्रास

AUS vs SA, 1st ODI: केशव महाराजच्या फिरकीने ऑस्ट्रेलियाचे कंबरडं मोडलं; ५ विकेट्स घेत द. आफ्रिकेचा विक्रमी विजय

Operation Sindoor : शालेय अभ्यासक्रमात भारतीय लष्कराची शौर्यगाथा सांगणार! 'ऑपरेशन सिंदूर' आता अभ्यासक्रमात शिकवणार...

Mumbai-Pune Latest Rain Updates Maharashtra: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

World Cup 2025 India Squad: वर्ल्ड कपच्या भारतीय संघात शफाली वर्माला स्थान का नाही? निवड समिती अध्यक्षांनी सांगितलं खरं कारण

SCROLL FOR NEXT