The plight of the Aurangabad-Ahwa road, which is a state highway, from Nampur to Malegaon. esakal
नाशिक

Nashik Road Damage: मालेगाव- नामपूर रस्ता नव्हे, मृत्यूचा सापळा; राज्यमार्ग असूनही दुरूस्तीकडे दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा

नामपूर : औरंगाबाद-अहवा राज्यमार्ग असलेला नामपूर-मालेगाव रस्त्याची खड्डयांमुळे अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. हा राज्यमार्ग आहे याच्यावर सहसा कुणाचा विश्वास बसणार नाही इतके खड्डे झालेले असून लोकप्रतिनिधी यावर काहीही बोलायला तयार नाहीत.

गेल्या काही वर्षात कोट्यवधी रुपयांचा खर्च अक्षरशः पाण्यात गेला आहे. बागलाणच्या हद्दीतील रस्ता इतका खराब झाल्याने वाहने चालविणे मुश्किल झाले असून या रस्त्यावरचा प्रवास धोकादायक बनला आहे.

रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्ड्यामुळे दुचाकीस्वाराना अडचणीचा सामना करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकामी तातडीने दखल रस्ता दुरुस्ती करावी, अशी मागणी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी केली आहे, अन्यथा आंदोलनात्मक पवित्रा स्वीकारण्याचा इशारा देण्यात आला आहे. (Malegaon Nampur Road Death Trap Neglect of repair despite state highway nashik)

खड्डयांच्या दणक्यांमुळे नामपूर मालेगाव रस्त्यालगत अनेक लहान मोठे अपघात होऊन निष्पपांना जीव गमवावा लागला आहे. या रस्त्यावर लहानमोठ्या अपघाताच्या घटना सातत्याने घडत असतात.

दोन वर्षांपूर्वी नामपूर येथील समीर शेख यांच्या पत्नी व मुलाचा मोटारसायकल अपघाताने मृत्यू झाला होता. या रस्त्याचे दर्जेदार पद्धतीने काँक्रिटिकरण करण्यात यावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

शहर व परिसरातील जवळपास सर्वच रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. नामपूर मालेगाव रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे अंबासन फाटा, कोठरे फाटा, मोराणे फाटा आदी ठिकाणी रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली आहे.

शहरातील सर्वात वर्दळीचा रस्ता म्हणून मालेगाव रस्ता ओळखला जातो. रस्त्यालगत कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालय असल्याने दररोज अनेक विद्यार्थी ये-जा करतात. परंतु रस्त्यावरील खड्डयांच्या साम्राज्यमुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे रस्ता दुरुस्ती होणे गरजेचे आहे.

मोसम खोऱ्यात यंदाच्या पावसाने रस्त्यांच्या साइडपट्टया तसेच अनेक खड्डय़ांमध्ये टाकण्यात आलेली माती आणि रस्त्यांवरील डांबर वाहून गेले आहे.

त्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे उघडे पडले आहेत. काही रस्त्यांवरून जाताना माती साचलेली असल्याने रस्त्यावर प्रचंड धुराळा उडत असल्याने दुचाकीस्वारांची तारांबळ होत आहे.

खड्डे चुकवावेत तरी कसे...

काकडगाव येथील धोकादायक वळणावर असणाऱ्या फरशी पुलाची उंची अतिशय कमी असल्याने नवीन पुलाच्या काम पूर्ण होऊनही नागरिकांना पुलाच्या उदघाटनाची प्रतीक्षा आहे.

शहर व परिसरातील हजारो नागरिक आपल्या शेतमालाच्या विक्रीसह खासगी कामकाजासाठी मालेगावी जात असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. परंतू या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडल्याने चालकांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे.

त्यांना या मोठ्या खड्ड्यातून मार्ग काढणे अवघड होत आहे. खड्डे एवढे मोठे आहे की त्यांनी रस्त्याचा अर्ध्याहून अधिक भाग व्यापला आहे. त्यामुळे हे खड्डे चुकविणे देखील जिकरीचे झाले आहे.

बांधकाम विभागाकडून या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले आहे. इतकी दुर्दशा होऊनही रस्ते दुरुस्त का केले जात नाही, असा रोखठोक सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

लोकांच्या जीवाशी खेळण्यात येत असून त्यात लोकांचा जीव जाण्याची वाट बांधकाम विभाग पाहत आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हा रस्ता तातडीने दुरुस्त न केल्यास बांधकाम विभागासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जेसी गटाचे नेते विलास सावंत, नामपूर बाजार समितीचे संचालक अविनाश सावंत, सहकारी सोसायटीचे माजी उपाध्यक्ष अरुण खुटाडे,

माजी सरपंच प्रमोद सावंत, जगदीश सावंत, अशोक पवार, ग्रामपंचायत सदस्य केदा सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते प्रसाद अलई, मोसम प्रतिष्ठानचे गणेश खरोटे, सुरेश कंकरेज, सुनील निकुंभ, शिवसेनेचे तालुका उपाध्यक्ष जितेंद्र सूर्यवंशी, तारिक शेख, आरपीआयचे तालुका उपाध्यक्ष किशोर मोरे आदींनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Reaction On Bihar Voting : बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील विक्रमी मतदानावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया आली समोर, म्हणाले...

Bus and Milk Tanker Accident : बस अन् दुधाच्या टँकरची समोरासमोर धडक; एका मुलासह तिघांचा मृत्यू, १७ प्रवासी जखमी

पुणे ते छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेसवे प्रकल्पाला वेग; तीन टप्प्यात पूर्ण होणार, वैशिष्ट्ये काय आहेत?

Bihar Election 2025 Voting : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ऐतिहासिक मतदान!

Akola Raid : लाच घेताना महिला लिपिक रंगेहात पकडली; अकोला एसपी कार्यालयात एसीबीचा छापा!

SCROLL FOR NEXT