Trucks parked on the busiest Mumbai-Agra highway due to lack of truck terminus in Malegaon city.
Trucks parked on the busiest Mumbai-Agra highway due to lack of truck terminus in Malegaon city. esakal
नाशिक

Nashik News: शहराला उद्याने, नाट्यगृह, ट्रक टर्मिनसची प्रतिक्षा! दिवसाला 200हून अधिक ट्रकची आवक-जावक

प्रमोद सावंत

Nashik News : महानगरपालिका कार्यक्षेत्रासाठी २००४ चा विकास आराखडा लागू आहे. २००६ पासून प्रत्यक्षात या विकास आराखड्याची अंमलबजावणी सुरु झाली. विकास आराखड्यातील सर्व रस्ते व प्रस्तावित जागांचा पुरेपुर वापर झालेला नाही.

आराखड्याच्या अंमलबजावणी अभावी १० लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरात उद्यान व नाट्यगृहासाठी दोन दशके प्रतिक्षा करावी लागत आहे. यंत्रमागाचे मॅंचेस्टर असलेल्या शहरात रोज सुताच्या सुमारे ७५ ट्रक येतात.

कापड तयार झाल्यानंतर प्रोसेसिंगच्या ५० हून अधिक ट्रक पाली, बालोत्राला जातात. याशिवाय भंगार, फळ व किराणा बाजारातील येथील उलाढाल मोठी आहे. या सर्वांची गोळाबेरीज पाहता दोनशेहून अधिक ट्रकची आवक-जावक होत असताना शहरात ट्रक टर्मिनसची सोय नाही. (malegoan City awaits parks theaters truck terminus More than 200 trucks in and out day Nashik News)

गिरणा पुलानजीकची शहराजवळील जागा ही २००४ च्या विकास आराखड्यात ट्रक टर्मिनससाठी आरक्षित करण्यात आली. त्यापुढे ग्रीन बेल्ट आहे. आजवर महासभेत तीन वेळा ट्रक टर्मिनसचा विषय उपस्थित होवूनही आरक्षित जागा खरेदी व अंमलबजावणी झाली नाही.

यामुळे शहरात सर्वत्र प्रमुख रस्त्यांवर ट्रक उभ्या असतात. याशिवाय जुन्या महामार्गावर नादुरुस्त व वर्षानुवर्षे उभी असलेली भंगार वाहने वेगळी. यामुळे सातत्याने वाहतुकीची कोंडी होते. शहरात अवजड वाहनांना वेळाही निर्धारित केलेल्या नाही.

रिक्षा थांबे, पार्किंग व वाहन थांब्यांचा अभाव आहे. यामुळे भर बाजारपेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुलावरील चारा बाजार, रामसेतू पुलावर पार्किंग होणारी चारचाकी वाहने व मोकाट जनावरे या प्रश्‍नांवर शेकडो आंदोलने झाली.

महानगरपालिका प्रशासनाला त्यावर तोडगा काढता आला नाही. शहरातील भंगार बाजार व सटाणा नाका परिसरातील किराणा बाजारपेठ ही जळगाव पाठोपाठ सर्वात मोठी बाजारपेठ मानली जाते. येथील फळबाजारही मोठा आहे.

शहरातील किराणा व फळे कसमादे परिसरात ठोक दराने विक्रीसाठी जातात. यात कोट्यवधीची उलाढाल होते. या बाजारपेठेत येणाऱ्या ट्रकसाठी सोयी-सुविधा नाहीत. गेल्या पाच दशकापासून तत्कालीन नगरपालिका व दोन दशकातील महानगरपालिका निवडणुकीत सर्वच पक्षांच्या जाहीरनाम्यांमध्ये मनोरंजनासाठी उद्यान करण्याचे आश्‍वासन असते.

निवडणुका होताच जागेची कमतरता व विकास आराखड्याच्या अंमलबजावणीत असलेल्या अनास्थेमुळे हे आश्‍वासन हवेत विरते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पोलिस कवायत, मसगा मैदान शहराचे हृदय

शहरात तालुका क्रिडा संकुल व कॅम्प रोडवर अत्याधुनिक जॉगिंग ट्रॅक साकारले आहे. दोन इनडोअर क्रीडा संकुल आहे. शारीरिक कसरतीची सोय असली तरी मनोरंजनाचा ठिकाणा नाही. यामुळे शहरवासीय घटका, दोन घटका कुटुंबीयांना कोठे घेऊन जाऊ शकत नाहीत.

मनोरंजनासाठी व चौपाटी म्हणून शहरवासिय खाद्यपदार्थांच्या शेकडो हातगाड्या असलेल्या पोलिस कवायत व मसगा महाविद्यालय मैदानाचा आधार घेतात. हे मैदान शहराचे हृदय व फुफ्फुस झाले आहे.

येथेच खाद्यपदार्थ, जॉगिंग ट्रॅक, खेळ, मनोरंजनाची साधने, हॉर्स रायडींग आदी सर्व सोयी-सुविधा आहेत. रमजान ईदचे मुख्य नमाज पठण व राजकीय पक्षांच्या राष्ट्रीय व राज्य स्तरावरील नेत्यांच्या सभेसाठी हेच मैदान उपयोगी ठरते.

पूर्व भागात अजीज कल्लू स्टेडिअम आहे. या स्टेडिअमचे काम दोन दशकात पूर्ण होऊ शकले नाही. शहरातील प्रतिभाशाली व्हॉलिबॉल, कबड्डी, क्रिकेट, खेळाडूंना सरावासाठी मैदानाची आवश्‍यकता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Cadbury chocolate: कॅडबरी चॉकलेटला लागली बुरशी? ग्राहकाने फोटो शेअर करताच कंपनीने दिलं उत्तर

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT