omicron Sakal
नाशिक

नाशिकमध्ये ओमिक्रॉनचा धोका? आफ्रिकेतून आलेला संशयित पॉझिटिव्ह

प्रमोद दंडगव्हाळ

सिडको, (नाशिक) : सिडको भागातील हॉटेल मध्ये असलेल्या दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या नागरिकाचा कोरोना अहवाल (Corona Test) पॉझिटिव्ह आला आहे. मनपा सिडको वैदयकिय विभागाने हॉटेलला भेट देऊन संपर्कात आलेल्या बारा कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर (RT PCR) तपासणीसाठी पाठविला आहे. ओमिक्रॉनच्या (Omicron Variant) पार्श्वभूमीवर त्यांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे नाशिककरांची चिंता वाढली असून, आरोग्य यंत्रणेसह जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर मनपाच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या माली या देशातून तीन नागरिक नाशिकमध्ये व्यवसाय संदर्भात आले होते. सिडको परिसरातील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास होते.संबंधित नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये एका नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, दोन नागरिकांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. मनपा सिडको वैदयकीय विभागाने त्वरीत दखल घेतली. वैदयकीय अधिकारी डॉ.बाजी यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर व कर्मचारी यांनी संबधीत हॉटेलला भेट दिली. संबधीत रुग्णाच्या संपर्कात आलेल्या १२ कर्मचारी यांचा आरटीपीसीआर तपासणी साठी पाठविला आहे. तसेच संपर्कात आलेल्या नागरिकांचा आरोग्य विभागातर्फे शोध घेतला जात आहे. तसेच, जिनोम स्क्वेन्सिंगचा अहवाल काय येतो, या नंतर पुढील निर्णय घेतला जाईल अशी माहिती डॉ. बाजी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT