Animal friend Purushottam Awhad with the dog that has recovered after the operation esakal
नाशिक

Nashik News : प्राणीमित्रांच्या तत्परतेमुळे जखमी कुत्र्याला जीवदान

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : एकीकडे आपण माणुसकी संपली म्हणून नेहमी बोलत असतो. परंतु दुसरीकडे असे काही उदाहरण बघायला मिळतात. ज्यामुळे आजही माणुसकी जिवंत आहे. असेच दिसून येते.

असाच काहीसा बिकट प्रसंग एका जखमी मुक्या जिवाच्या बाबतीत घडला. त्यासाठी सर्व प्राणी मित्र धावून आले. (Mangal Swaroop Gaushala head Purushottam Avhad and team save dog life nashik news)

त्याच्यावर योग्य ते उपचार केले आणि आज तो कुठे ठीकठाक आहे. त्यामुळे प्राणी मित्रांच्या या योगदानाबाबत सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे.

सातपूर परिसरात अचानक फटाके फोडल्यामुळे भेदरलेला कुत्रा रस्त्यावर सैरावैरा पळू लागला. त्यामुळे त्यातच त्याला एका वाहनाने जोरात धडक दिली. त्यात तो जखमी झाला. वेळीच प्राणी मित्रांनी धावाधाव केली. त्याला एका ठिकाणी सुखरूप मोकळ्या जागेत बाजूला केले. कोणी पाणी पाजले तर कोणी डॉक्टरांना बोलावले.

त्याचवेळी सिडकोतील मंगल स्वरूप गोशाळेचे पुरुषोत्तम आव्हाड यांच्या टीमने त्यास आपल्या वाहनातून दवाखान्यात आणले. त्याच्या डोळ्याचे ऑपरेशन केले. नंतर त्यास सिडकोतील मंगलस्वरुप गोशाळेत आणले आहे. श्री. आव्हाड यांच्या या प्राणी प्रेमाबाबत नागरिक व पाणी मित्रांनो त्यांचे स्वागत केले आहे.

एकीकडे भटक्या कुत्र्याबाबत नागरिकांमध्ये नेहमीच नाराजीचा सूर दिसून येतो. तर दुसरीकडे याच भटक्या कुत्र्यावर जेव्हा अशा प्रकारची आपबीती येते. त्यावेळेस मात्र याच नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होताना दिसते. त्यामुळे आजही माणुसकी शिल्लक आहे. असेच यानिमित्त दिसून येते. त्यामुळे प्राणीमित्रांचे काम खरोखरच वाखाणण्याजोगे आहे. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

''जखमी कुत्र्याला प्राण्यांच्या रुग्णालयात नेले. डॉ. सोनवणे यांनी कुत्र्यांची तपासणी केल्यानंतर डोळा काढावा लागेल, असे सांगितले. लगेच ऑपरेशन केले. कुत्र्याचे ऑपरेशन करून १० दिवस झाले. जखमी कुत्रा बरा आहे. पुढील सर्व जबाबदारीचे काम मंगलरूप गोशाळेतच केले जाईल.'' - पुरुषोत्तम आव्हाड, संचालक, मंगळरूप गोशाळा, सिडको

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramdas Kadam : 'बाळासाहेबांचा मृतदेह २ दिवस मातोश्रीवर ठेवला' ही माहिती रामदास कदमांना कुणी दिली? स्वत: सांगितलं नाव...

Maharashtra tourism : महाराष्ट्राचे दार्जिलिंग! फोफसंडी गावाची या खासियत तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या

Pune Crime: पुण्यातील दौंडमध्ये थरारक घटना! पत्नीचा गळा दाबून खून, नंतर उचललं टोकाचं पाऊल

Latest Marathi News Live Update : फर्ग्युसन रस्त्यावरील वाहतूक आज काही वेळासाठी बंद करण्यात येणार

Panchang 3 October 2025: आजच्या दिवशी अर्गला स्तोत्र पठण व ‘शुं शुक्राय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT