mansion built in flat in Indiranagar Sights of tribal culture on walls esakal
नाशिक

Nashik News: इंदिरानगरमध्ये सदनिकेत साकारला वाडा! भिंतींवर आदिवासी संस्कृतीचे दर्शन

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : सिमेंटच्या जंगलात सदनिका संस्कृती वाढत असताना वाडा संस्कृती टिकवण्यासाठी सदनिकेत वाडा साकारला आहे.

इंदिरानगरमधील गणराज कॉलनीत तोडकर वाडा म्हणून ओळखला जातो. डॉ. संध्या तोडकर यांच्या घरामध्ये प्रवेश करताच शंभर वर्षांपूर्वीचा सागाचा रेखीव दरवाजा आपले स्वागत करतो. (mansion built in flat in Indiranagar Sights of tribal culture on walls Nashik News)

डॉ. तोडकर यांच्या घरामध्ये दोन हजार प्राचीन वस्तू पाहावयास मिळतात. बैठक खोलीमध्ये आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडते. सर्व भिंतीवर मुलगी डॉ. वैभवी हिने वारली चित्रातून आदिवासी संस्कृती साकारली आहे.

याच खोलीत ‘मस्तानी कमान’ चे आकर्षण आहे. भटकंती करताना शंभरहून अधिक बांबूपासून बनवलेल्या वस्तू डॉ. तोडकर यांनी जमा केल्या आहेत. मध्य प्रदेशमधून त्यांनी रंगीत लाकडी वस्तू आणल्या आहेत.

त्यामधील राजाची सफारी आकर्षित करते. टेराकोटा वस्तूमधून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडते. मातीपासून बनवलेले पंधरा पक्षी समोर दिसतात. ग्रँड फादर क्लॉक हे साडेपाच फूट उंच घड्याळ घरात आहे.

पूर्वीच्या काळी राणी वापरत असलेल्या पर्स त्यांच्याकडे आहे. पेढे घाटाचा दागिन्यांचा डबा, चाळीस प्रकारचे अडकित्ते, दोनशे टपाल तिकिटे, देश-परदेशातील नोटा, पाचशे जुनी नाणी संग्रहात आहेत.

३२ वर्षांपासून डॉ. तोडकर या जुन्या वस्तूंचे संग्रह करत आहेत. त्यांचे काका येवल्याचे ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांच्या प्रेरणेने त्यांनी वाड्याची निर्मिती केली. त्यांच्या संग्रहातील लाकडावरील रोम शहर आकर्षित करते.

वाड्यात त्यांच्याकडे बंजारा समाजातील महिलांचे पारंपारिक दागिने आहेत. भातुकलीचा खेळ आहे. जाते, पाटे, वरवंटे, उखळ, मुसळ आदी दगडाच्या वस्तू दिसतात. त्यांनी ‘टेरेस'वर औषधी वनस्पतीची छोटी बाग तयार केली आहे. या कामात त्यांना पती राजेंद्र तोडकर यांचे मोठे सहकार्य मिळते.

"आपली संस्कृती टिकावी आणि नवीन पिढीला त्याची माहिती मिळावी म्हणून सदनिकेला वाड्याचा लुक दिला आहे. भविष्यात नाशिकमध्ये जागा उपलब्ध झाल्यास आदिवासी संस्कृती आणि प्राचीन वस्तूंचे संग्रहालय उभारण्याची इच्छा आहे."- डॉ. संध्या तोडकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Property Tax : समाविष्ट गावाच्या मिळकतकराचा प्रश्‍न जैसे थे; पूर्वीच्याच आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Ayurvedic Kadha for Winter: थंडीमुळे सर्दी-खोकला आणि अंगही खाजतंय? 'हा' आयुर्वेदीक काढा आहे सुपर इफेक्टिव्ह!

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

SCROLL FOR NEXT