Protesters stopping a bus at Yewala on Sunday and blackening the poster of the state government on it. esakal
नाशिक

Maratha Reservation Agitation: मराठा आरक्षण आंदोलनाची धग वाढली! येवल्यात शासनाच्या पोस्टरला फासले काळे

सकाळ वृत्तसेवा

Maratha Reservation Agitation : राज्य सरकार मराठा आरक्षणप्रश्नी निर्णय घेत नसून, जरांगे-पाटलांच्या उपोषणाकडेही दुर्लक्ष होत असल्याने सुरेगाव रस्ता (येवला) येथे रविवारी (ता. २९) संतापलेल्या तरुणांनी राज्य परिवहन महामंडळाची बस थांबवून त्यावरील नेत्यांच्या व शासनाच्या पोस्टरला काळे फासून अनोखा निषेध केला.

दरम्यान, येवल्यात सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने सकल मराठा समाज सोमवार (ता. ३०)पासून सरणावर झोपून अन्नत्याग आंदोलन करणार आहे.

जळगाव येथे रविवारी आरक्षणप्रश्नी कॅंडल मार्च काढण्यात आला. ठिकठिकाणी साखळी उपोषणे सुरू असून, नेत्यांना गावबंदी करण्यात आली. शासकीय कार्यक्रमांवरही बहिष्काराचे अस्त्र उपसण्यात आले आहे. (Maratha reservation agitation increased Government posters torn black by protesters at yeola nashik)

पाच दिवसांपासून मनोज जरांगे-पाटील यांचे अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे प्राणांतिक उपोषण सुरू आहे. त्यांची प्रकृती खालावली असून, त्यांना पाठिंबा देण्यासाठी खानदेशात मराठा समाज पेटून उठला आहे.

आंदोलनाची धग वाढली असून, आता गावोगावी नेत्यांना गावबंदी, मुंडण आंदोलन, चौकबंदी, साखळी उपोषण सुरू आहेत. रविवारी नाशिकमधील औद्योगिक परिसरातील सातपूर भागात आंदोलनकर्त्यांची बैठक होऊन नेत्यांना गावबंदी करण्यात आली.

मराठा आरक्षणासाठी दुसऱ्यांदा अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषणास बसलेल्या जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला राज्यभरासह जिल्ह्यातून प्रतिसाद वाढत आहे.

त्यांनी केलेल्या आवाहनानुसार जिल्ह्यातील प्रत्येक गावात आता सकल मराठा समाजातर्फे बेमुदत साखळी उपोषणास सुरवात झाली.

जिल्ह्यातील डाबली, टेहेरे (ता. मालेगाव), सटाणा, उमराणे (ता. देवळा), मनमाड (ता. नांदगाव) येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणात विविध संघटना, व्यक्ती यांनी सहभागी होत आपला पाठिंबा दर्शविला आहे.

सोमवारी छावा संघटनेतर्फे पांगरी (ता. सिन्नर) येथे रास्ता रोको करण्यात येईल. त्यानंतर उपोषणास प्रारंभ केला जाणार आहे.

विशेष अधिवेशन बोलवा : बनकर

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे-पाटील यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला माझा पाठिंबा असून, राज्यातील मराठा समाजाची गेल्या अनेक दशकांपासून असलेली आरक्षणाची मागणी लक्षात घेत आरक्षण मिळवून देण्याकामी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे.

या अधिवेशनात ठराव करून केंद्र सरकारला पाठविण्यात यावा. जेणेकरून महिला आरक्षणाप्रमाणे घटनेत दुरुस्ती करून आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावून मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअजित पवार यांच्याकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

SCROLL FOR NEXT