marathi sahitya sammelan.jpg 
नाशिक

Marathi Sahitya Sammelan : राज्यातील पाच शहरांमध्ये थेट प्रक्षेपण; प्रयोग यशस्वी झाल्यास ठरेल राज्यातील पहिलाच प्रयोग 

दत्ता जाधव

नाशिक : येथील गोखले शिक्षण संस्थेच्या आवारात लोकहितवादी मंडळातर्फे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. ते अधिकाधिक रसिकांपर्यंत पोचविण्याचा मंडळाचा मानस आहे. त्यासाठी मुख्य कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण मुंबई, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर या शहरांमध्ये केले जाईल, अशी माहिती संमेलनाचे निमंत्रक तथा मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांनी दिली. 

साहित्य संमेलनाचे राज्यातील पाच शहरांमध्ये थेट प्रक्षेपण 
जातेगावकर म्हणाले, की स्थळनिश्‍चितीनंतर सर्व्हेअर्सच्या माध्यमातून कामांनी वेग घेतला आहे. नाशिकमधील मराठी साहित्य संमेलन हा एक लोकोत्सव करण्याचा संकल्प लोकहितवादी मंडळाने सोडला असून, कोरोनानंतरच्या काळात होणारे हे संमेलन म्हणूनच महत्त्वाचे आहे. गेल्या दहा महिन्यांपासून निद्रावस्थेत गेलेल्या समाजाला खऱ्या अर्थाने ऊर्जितावस्था आणणारा हा सोहळा भव्य-दिव्य करण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे. लोकांनी दिलेला प्रत्येक रूपया आमच्यासाठी महत्त्वाचा आणि अमूल्य आहे. तो सत्कारणी लावला जाईल. 

राज्यातील पहिलाच प्रयोग ठरेल,
संमेलनाध्यक्षपदी खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर व स्वागताध्यक्षपदी पालकमंत्री छगन भुजबळ यांची निवड झाल्याने साऱ्यांच्याच अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यामुळे हे संमेलन एकाच वेळी राज्यातील पाच शहरांमधील मोठ्या सभागृहात व मोठ्या पडद्यावर थेट प्रक्षेपित करण्याचा कार्याध्यक्ष हेमंत टकले यांचा मानस असून, हा प्रयोग यशस्वी झाल्यास तो राज्यातील पहिलाच प्रयोग ठरेल, असेही जातेगावकर म्हणाले. 


उपस्थिती वाढण्याची शक्यता 
सद्या कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात केवळ पन्नास टक्के उपस्थितीला परवानगी आहे. मात्र केंद्र सरकार फेब्रुवारीमध्ये ही सवलत वाढविण्याची शक्यता असल्याने संमेलनाला ७५ टक्के अथवा शंभर टक्के उपस्थितीला परवानगी मिळू शकते. लोकसहभागातून साजरा होणा-या सोहळ्यातील प्रत्येक रूपया सत्कारणी लावत नाशिकमध्ये होणारे तिसरे साहित्य संमेलन यशस्वी करणार, असा विश्‍वासही जातेगावकर यांनी व्यक्त केलायं.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat case : अशोक खरात प्रकरणातील महिलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करताय? तर थांबा, पोलिसांची पहिली कठोर कारवाई

8th Pay Commission Update : सरकारी कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपणार ? आठव्या वेतन आयोगाच्या रिपोर्टबाबत सरकारकडून मोठी अपडेट !

डम्पर मालकाने पगार थकवला; पैशासाठी सतत विनवणी, तरीही हाती निराशा, चालक संतापला अन्... थरारक व्हिडिओ व्हायरल

विना ID प्रूफ वापरता येणार नाही फेसबुक-इंस्टाग्राम! मोदी सरकारने तयार केला 'डिजिटल चक्रव्यूह'; जाणून घ्या नवा नियम

Pune Metro News: पुण्यातील भुयारी मेट्रो मार्गावर आता ‘रूट मार्कर’ बसणार; बोगद्याला मोठे छिद्र, नागरिकांना परवानगी घ्यावी लागणार!

SCROLL FOR NEXT