market committee esakal
नाशिक

बाजार समित्या सुरू की बंद; कोट्यवधींचे व्यवहार तुंबले

सकाळ डिजिटल टीम

नाशिकः ऐन सणासुदीच्या तोंडावर शेतकरी हवालदिल आहे. जे थोडेफार पीक पदरात पडले, त्याची रास केली. कोणी उन्हाळी कांदा, तर कोणी आणखी काही जे शक्य असेल ते बाजारात आणत होते. अशातच दिवाळीच्या काळामध्ये जिल्ह्यात बाजार समित्या सुरू की बंद, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. बाजार समिती आणि प्रशासन यांच्यातील विसंवादामुळे अनेक ठिकाणी कोट्यवधींचे व्यवहार तुंबले आहेत.

अनेक ठिकाणी बाजार समित्यांचे व्यवहार बंद

सणाच्या काळात किमान दहा दिवस तर मजूर मिळणे शक्य नाही. हे पाहता हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. दिवाळीमुळे जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या 30 ते 8 नोव्हेंबर म्हणजे 10 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय बाजार समित्यांनी घेतला. या काळात कांद्यासह सर्व लिलावही बंद राहणार होते. या निर्णयावर फेरविचार करावा, अशी मागणी करत कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने पणन संचालक आणि जिल्हा सहकारी संस्थांचे जिल्हा उप निबंधक सतीश खरे यांना साकडे घातले होते. त्यामुळे जिल्हा उप निबंधकांनी समित्या दहा ऐवजी फक्त तीन दिवस बंद ठेवण्याचे आदेश देत पत्र काढले. मात्र, अनेक ठिकाणी बाजार समित्यांचे व्यवहार बंद आहेत. अनेक ठिकाणी सुरू आहेत. त्यामुळे आपल्या जवळची बाजार समिती बंद की सुरू, हेच शेतकऱ्यांना कळत नाहीय. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार तुंबले आहेत.

मालेगावमध्ये कांदा लिलाव बंद

लासलगाव बाजार समितीच्या विंचूर उपबाजारात कांदा आणि भुसार मालाचे लिलाव सुरू आहेत. मात्र, मालेगावमध्ये कांदा लिलाव बंद आहेत. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही सोमवारी लिलाव सुरू होते. पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये भाजीपाला आणि टोमॅटो लिलाव सुरू आहेत. भुसार मालाचे लिलाव कालपर्यंत सुरू होते. कांदा लिलाव मात्र बंद आहेत. तरीही या प्रकरणी व्यापाऱ्यांशी बोलणे सुरू असल्याचे बाजार समिती प्रशासनातर्फे सांगण्यात आले. चांदवडमध्येे भाजपाला आणि फुलांचे लिलाव सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे, मुंबई अन् नागपूरनंतर आता कोल्हापूरमध्येही होणार आंतरराष्ट्रीय Cricket Stadium; राज्य मंत्रिमंडळाकडून प्रस्तावाला मंजूरी

पटसंख्येची अट शिथिल करा! शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन थांबवा, मुख्याध्यापक संघाची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी, शिक्षणमंत्री काय म्हणाले? वाचा...

Promise Day 2026: प्रॉमिस डेनिमित्त काहीतरी खास हवंय? ‘हे’ वचन दिलंत तर नात्यात येईल नवी गोडी

Bangladesh Hindu Killing : बांगलादेशात निवडणुकीपूर्वी आणखी एका हिंदूची हत्या! ; व्यावसायिकाला दुकानात कोंडून मारले

T20 World Cup: भारतीय खेळाडू Bat Tempering करण्याचा दावा करणाऱ्या क्रिकेटपटूचा यू-टर्न; म्हणाला, 'मला तर असं काही....'

SCROLL FOR NEXT