mother daughter
mother daughter esakal
नाशिक

विवाहितेचे टोकाचे पाऊल; २ वर्षाच्या लेकीलाही संपविले

संतोष विंचू

येवला (जि.नाशिक) : कुसुर येथील बेपत्ता मायलेकीचा (mother-daughter) मृतदेह आज गावातीलच विहिरीत आढळून आल्याने हळहळ व्यक्त झाली. जयश्री सचिन गायकवाड (२४) व मुलगी प्रांजल सचिन गायकवाड (२) या बेपत्ता मायलेकीबद्दल तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर सुमारे ४० ते ५० फूट पाणी उपसल्यानंतर विहिरीच्या तळाशी गाळामध्ये दोघी मायलेकींचा मृतदेह आढळून आला. पण असे काय घडले? की जयश्रीने टोकाचे पाऊल उचलले....

पोटच्या गोळ्यासह स्वत:लाही संपविले

जयश्रीला कौटुंबिक कारणणावरून शारीरिक व मानसिक त्रास दिला जात होता शिवाय माहेरून पैसे आणण्यासाठीही तिचा छळ होत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. उपजिल्हा रुग्णालयातील विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून मायलेकीवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. उपविभागीय पोलिस अधिकारी समीरसिंग साळवे यांनी घटनास्थळी भेट दिली. जयश्रीने आपल्या पोटच्या गोळ्यासह आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे. जयश्रीचे वडील नारायण रंगनाथ आहेर यांच्या तक्रारीवरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयश्रीचा पती सचिन गायकवाड, सासरे सूर्यभान गायकवाड, सासू सुमन गायकवाड यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

कारसाठी पैसे न आणल्याने छळ

सासरच्या छळाला कंटाळून कुसुर येथील विवाहितेने आपल्या दोन वर्षांच्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. कार घेण्यासाठी माहेरून एक लाख रुपये आणण्यासाठी तिचा छळ होत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी सासू, सून व पतीच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीसह सासू, सासऱ्यांना अटक करण्यात आली आहे. या मायलेकीचा शोध सुरू असताना नातेवाईकांना त्याच्या शेतातील विहिरीजवळ त्यांच्या चपला आढळून आल्यानंतर युवक व तालुका पोलीस निरीक्षक अनिल भवरी यांनी तीन मोटरच्या साह्याने हा शोध लागला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT