city's water supply
city's water supply  
नाशिक

शहरातील पाणी कपातीवर महापौरांची फुली; तूर्तास संकट टळले!

विक्रांत मते

नाशिक : गंगापूर, दारणा व मुकणे या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असला तरी दारणा धरणांमधून (Darana Dam) अळीयुक्त पाणी येत असल्याने गंगापूर (Gangapur Dam) व मुकणे धरणातून (Mukane Dam)अतिरिक्त पाणी उचलले जात आहे. परिणामी आरक्षित पाणी १४ जुलैपर्यंत पुरेल इतके असल्याने प्रशासनाने पाणी कपातीचा सादर केलेला प्रस्ताव फेटाळण्याचा निर्णय महापौरांच्या अध्यक्षतेखालील गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला. (Mayor decision not to cut water supply in Nashik city)

१४ जुलैपर्यंत पुरेल इतकाच आरक्षित पाणीसाठा

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर दारणा व मुकणे धरणामध्ये १५ ऑक्टोंबर २०२० ते ३१ जुलै २०२१ या कालावधीसाठी ५ हजार ५०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित केले आहे. आतापर्यंत वीस लाख लोकसंख्येसाठी तीन हजार ५७८ दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर केला आहे. तीन धरणांपैकी दारणा धरणातून अळी व दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याने नोव्हेंबर २०२० पासून पाणी उचलणे बंद केले आहे. दारणा धरणातून चारशे दशलक्ष घनफूट पाण्यापैकी अवघे १६. ७१ दशलक्ष घनफूट पाणी उचलले आहे. दारणाऐवजी महापालिकेकडून गंगापूर धरणातून अतिरिक्त पाणी उचलले जात आहे. त्यामुळे दारणा धरणातील पाण्याचे आरक्षण गंगापूर व मुकणे धरणावर टाकावे, अशी मागणी महापालिकेच्या वतीने जलसंपदा विभागाकडे केली आहे. दरम्यान, गंगापूर व मुकणे धरणात १४ जुलैपर्यंत पुरेल इतकाच आरक्षित पाणीसाठा असल्याने प्रशासनाने दररोज होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या वेळेमध्ये १५ ते २० मिनिटे किंवा दिवसातून एकदा पाणी कपात करण्याचा प्रस्ताव महापौर सतीश कुलकर्णी यांच्याकडे सादर केला होता. त्या पार्श्वभूमीवर गटनेत्यांची शुक्रवारी (ता.७) बैठक झाली. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, सभागृह नेते सतीश सोनवणे, भाजप गटनेते जगदीश पाटील, शिवसेना गटनेते विलास शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते गजानन शेलार, अधीक्षक अभियंता संदीप नलावडे, कार्यकारी अभियंता शिवाजी चव्हाणके, अविनाश धनाईत आदी. उपस्थित होते.

दहा दिवसांनी पुन्हा बैठक

प्रशासनाने पाणी कपातीचा सादर केलेल्या प्रस्तावाला विरोध करण्यात आला. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी कोरोनामुळे नागरिक घरात असल्याने अधिक पाणी वापरले जात आहे, अशा परिस्थितीत पाणी कपात केली तर नागरिकांना अधिक त्रासाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे पाणीकपात करू नये, अशी आग्रही भूमिका मांडली. गटनेत्यांच्या सूचनांचा विचार करून महापौर सतीश कुलकर्णी यांनी तूर्तास कुठलीही कपात केली जाणार नसल्याचे घोषित केले. मात्र नागरिकांनी पाणी जपून वापरण्याची चा सल्ला दिला. दहा दिवसांनी पाण्याची परिस्थिती बघून पुन्हा बैठक घेतली जाणार आहे.

तूर्तास कुठलीही पाणी कपात केली जाणार नाही, मात्र नागरिकांनी उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करून जपून वापरावे.

- सतीश कुलकर्णी महापौर.

यंदा मान्सून वेळेत येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्याव्यतिरिक्त कोरोना मुळे नागरिक घरात असल्याने कपातीमुळे आणखीन अडचणीत भर पडेल. त्यामुळे शिवसेनेचा कपातीला विरोध होता.

-अजय बोरस्ते, विरोधी पक्ष नेता.

Mayor decision not to cut water supply in Nashik city

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT