Measles  esakal
नाशिक

Nashik News : गोवर संसर्गाने धडकी वाढवली; आणखीन 5 नमुने हाफकिन संस्थेकडे तपासासाठी

विक्रांत मते

नाशिक : मुंबई व मालेगाव पाठोपाठ नाशिकमध्ये गोवरने आणखीन धडकी भरवली आहे. हाफकीन संस्थेकडे आणखीन पाच अहवाल तपासणीसाठी पाठविल्याने एकूण अहवालांची संख्या नऊ झाली आहे. दरम्यान, अहवाल अजून प्राप्त होणे बाकी असले तरी महापालिकेने तयारीचा भाग म्हणून बिटको व डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात संसर्गजन्य आजाराचे कक्ष कार्यान्वित केले आहे. (Measles infection in city 5 more samples to Haffkine Institute for investigation Nashik Latest Marathi News)

कोरोनाचा सामना करणाऱ्या नाशिककरांना या वर्षाच्या प्रारंभी काही प्रमाणात दिलासा मिळाला. मात्र, त्यानंतर डेंगी व स्वाइन फ्लू आजाराने तोंड वर काढले. या दोन्ही आजारांवर नियंत्रण मिळत नाही तोच नाशिकमध्ये गोवरची लागण होण्याची भीती निर्माण झाली आहे. मागील महिन्यात मुंबई शहरामध्ये गोवरची साथ पसरली. गोवरच्या या साथीमुळे अनेक मुले व्हेंटिलेटरवर गेली. संसर्गजन्य या आजाराचा प्रसार मुंबईनंतर नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये होण्यास सुरवात झाली.

मुंबई शहरात गोवरमुळे तीन मुलांचा मृत्यू झाला. त्या व्यतिरिक्त राज्यात इतर कोठेही मोठ्या प्रमाणात उद्रेक दिसून आला नाही. नाशिकमध्ये मागील आठवड्यापर्यंत गोवरचा एकही रुग्ण नव्हता. मात्र, आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणामध्ये गोवरचे संशयित चार रुग्ण आढळले. त्या संशयित बालकांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी मुंबईच्या हाफकीन संस्थेकडे पाठविण्यात आले. त्या संस्थेकडून अद्याप अहवाल प्राप्त झाला नाही.

मात्र, महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने केलेल्या सर्वेक्षणामध्ये आणखीन पाच संशयित आढळून आले. त्यामुळे या पाचही संशयित बालकांच्या रक्ताचे नमुने हाफकिन संस्थेकडे पाठविण्यात आले आहे. येत्या तीन ते चार दिवसात अहवाल प्राप्त होतील. एकूण नऊ अहवालांची महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला प्रतीक्षा आहे.

Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?

डॉ. हुसेन, बिटको रुग्णालयात संसर्गजन्य कक्ष

अद्याप नाशिकमध्ये एकही रुग्ण आढळला नाही. ही बाब सुखावणारी असली तरी महापालिका हाय अलर्ट मोडवर आली आहे. कठडा येथील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात संसर्गजन्य कक्षाची स्थापना करण्यात आली आहे, तर नाशिक रोडच्या बिटको रुग्णालयामध्येदेखील गरज भासल्यास कक्ष उभारणीच्या सूचना आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या आहेत.

गोवर लसीकरणाचे ५६ टक्के उद्दिष्ट

मुंबई व मालेगावमध्ये गोवरचे रुग्ण आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून लहान बालकांना गोवर लस टोचण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. आत्तापर्यंत २९ हजार बालकांना गोवर लस टोचण्यात आली असून, हे उद्दिष्ट ५६ टक्के पूर्ण झाले आहे. मात्र महापालिकेच्या उद्दिष्टानुसार ५८ टक्के उद्दिष्ट पूर्ण होणे अपेक्षित होते. दोन टक्के उद्दिष्ट अपूर्ण राहिल्याने तातडीने लसीकरणाची गती वाढविण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT