President Pramod Bhabad speaking at the general meeting of District Labor Organizations Co-operative Union held on Friday esakal
नाशिक

Nashik News: आरोप-प्रत्यारोपांनी गाजली जिल्हा मजूर फेडरेशनची सभा

माझ्या स्वाक्षरीचे अधिकार कोणालाही दिलेले नसल्याचे भाबड यांचे स्पष्टीकरण

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिल्हा मजूर संस्थांचा सहकारी संघाची (जिल्हा मजूर फेडरेशन) सर्वसाधारण सभा आरोप-प्रत्यारोपांनी चांगलीच गाजली. संघाकडून मजूर संस्थांना दिल्या जाणाऱ्या शिफारशींवर अध्यक्षांच्या स्वाक्षरी परस्पर केल्या जात असल्याचा गंभीर आरोप सभासदांनी केला.

तसेच संघामधील कर्मचारी पदोन्नतीत मागासवर्गीय कर्मचाऱ्याला डावलण्यात आला असल्याचाही आरोपही या वेळी झाला. याच मुद्यावर सभेत वादळी चर्चा होऊन सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली. (meeting of District Labor Federation resounding with accusations and counter accusations Nashik News)

नाशिक जिल्हा मजूर संस्थांच्या सहकारी संघाची ५४ वी सर्वसाधारण सभा शुक्रवारी (ता. २२) अध्यक्ष प्रमोद भाबड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सुरवातीस संजय बलकवडे यांनी मजूर संस्थांना दिल्या जात असलेल्या शिफारशींवर अध्यक्षांच्या परस्पर स्वाक्षरी होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला.

या स्वाक्षरी कोण करतात, अध्यक्षांनी कोणाला, असे अधिकार बहाल केलेले आहे का, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. अध्यक्षांच्या अनुपस्थितीत त्यांच्या स्वाक्षरींचा गैरवापर होणे ही गंभीर बाब असल्याचे विठ्ठल वाजे यांनी सांगितले.

त्यावर सभासद किरण निरभवणे यांसह सभासदांनी एकच विचारणा सुरू केली. बलकवडे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नियुक्ती करण्याची आग्रही मागणी केली. असा कोणताही प्रकार झालेला नसल्याचे संचालक मंडळाकडून सांगण्यात आले.

त्यानंतर प्रश्नांचा भडिमार सुरू झाल्यानंतर अखेर अध्यक्ष भाबड यांनी माझ्या स्वाक्षरीचे अधिकार मी कोणालाही दिलेला नसल्याचे खुलासा करत एका शिफारशींबाबत घडलेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करत वादळी चर्चेला पूर्णविराम दिला.

संघामध्ये कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. मात्र, यात मागासवर्गीय कर्मचाऱ्यास डावलण्यात आले असल्याचा मुद्दा रवी भालेराव यांनी उपस्थित केला. हा प्रकार गंभीर असल्याचे निरभवणे यांसह सभासदांनी सांगितले.

संघात पदोन्नतीत सर्वांना न्याय देण्यात आलेला आहे. कोणालाही डावलण्यात आले नसल्याचा खुलासा संघ सचिवांनी केला. संघाच्या थकीत वर्गणी मागणीवरून सचिवांविरोधात अनेक सभासदांनी तक्रारींचा पाढा वाचला.

संघाचे उत्पन्न वाढीसाठी नवीन स्रोत वाढविण्यावर विचार व्हावा, सर्व संस्थांची कामे संघामार्फत मिळावीत, थकीत वर्गणीचे टप्पे करून द्यावे, संघाने घेतलेल्या जागा विक्री, ठराविक मजूर संस्थांना कामे दिली जातात आदी विषय सभासदांनी उपस्थित केले.

या चर्चेत निवृत्ती न्याहळकर, अशोक म्हस्के, उद्धव पवार, महेश भामरे, विष्णू गिते, अनिता भामरे आदींनी सहभाग घेतला.

सभेला संघाच्या उपाध्यक्षा शर्मिला कुशारे, संचालक राजेंद्र भोसले, शिवाजी रौंदळ, संपत सकाळे, प्रमोद मुळाणे, सतीश सोमवंशी, शिवाजी कासव, भारत कोकाटे, अमोल थोरे, रोहित पगार, सुरेश भोये, राजेंद्र गावित, ज्ञानेश्वर लहाने, सविता धनवटे, राजाभाऊ खेमनार, अर्जुन चुंभळे, शशिकांत उबाळे, कविता शिंदे, दीप्ती पाटील, संजय चव्हाण, युवराज गोलाईत, सचिव सुनील वारुंगसे आदी उपस्थित होते.

अध्यक्षांना बोलू द्या

सभेत सभासदांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्यांची उत्तरे ही व्यासपीठावरून अध्यक्ष भाबड यांनी देणे अपेक्षित होते. मात्र, सभासदांच्या अनेक प्रश्नांना राजेंद्र भोसलेच उत्तर देत असल्याने सभासदांनी थेट अध्यक्षांना बोलू द्या, आपण उत्तरे देऊ नये, असे सांगत भोसले यांना रोखले.

संचालक मंडळाचा खर्च सचिवांकडून

सभेत सभासदांनी आरोप करत असताना सभासदांनी संघाचे सचिव वेतनातील दहा टक्के रक्कम ही अध्यक्ष व संचालक मंडळावर खर्च

करत असल्याचा खळबळजनक आरोप केला. त्यावर सभागृहात एकच गोंधळ झाला. मात्र, असा प्रकार होत नसल्याचा खुलासा संचालक मंडळाकडून करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Fraud News : बेरोजगारांच्या फसवणुकीचे मायाजाल! नोकरीचे आमिष दाखवून तरुण- तरुणींना लाखोंना गंडा

Latest Maharashtra News Updates : नवीन मद्य विक्री परवान्यावरून तृप्ती देसाई यांचा सरकारवर हल्लाबोल

Viral Video: लहानपणीची गोष्ट खरी ठरली! ससा अन् कासवाची लावली स्पर्धा; ससा का हरतो? खरं कारण आलं समोर

Nashik News : सहकार वर्षानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीची महत्त्वपूर्ण बैठक

Hadsar Fort: हडसर गडावर सापडला इतिहासाचा अमूल्य ठेवा; गड संवर्धन मोहिमेत मिळाला फारसी शिलालेख

SCROLL FOR NEXT