24_03_2020-kirana_20137137.jpg
24_03_2020-kirana_20137137.jpg 
नाशिक

भरचौकात राडा! किरकोळ वाद गेला टोकाला आणि घडला प्रकार; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळवृत्तसेवा

मालेगाव (नाशिक) : शहरातील देवीचा मळा व रमजानपुरा भागातील मेमन कॉलनीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन व्यापारी कुटुंबीयांनी हाणामारी केली. हाणामारीत कटर व चाकूचा वापर झाल्याने दोघे जण जखमी झाले. पवारवाडी व रमजानपुरा पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारीवरून दोन्ही गटांतील सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. वाचा काय घडले नेमके?

अशी आहे घटना

शहरातील देवीचा मळा भागात किरकोळ वादातून किराणा दुकानदारास चौघांनी मारहाण केल्याची घटना घडली. शहबाज मोहंमद युसूफ मेमन (वय २८) या किराणा दुकानदाराला बिलाल मेमन, शोहेब रफीक मेमन, सोहेल रफीक मेमन व रफीक मेमन (सर्व रा. मेमन कॉलनी, रमजानपुरा) यांनी मारहाण केली. तिघा संशयितांनी पकडून ठेवल्यानंतर रफीक मेमनने दंडावर चाकूने वार केले. सर्व संशयितांनी शहबाजच्या दुकानात जाऊन आम्हाला व्यापाऱ्याकडून मिठा मसाला व गुलकन चेरी हा माल घेऊन दे, असे सांगितले. शहबाजने, ‘तुम्हाला व्यापारी माल देणार नाही’, असे सांगितल्याचा राग आल्याने चौघांनी मारहाण केल्याचे शहबाजने तक्रारीत म्हटले आहे.

मारहाणीचा गुन्हा दाखल

याउलट रफीक अब्दुल मजीद यांनी दिलेल्या तक्रारीत शहबाज युसूफ मेमन, अज्जु युसूफ मेमन व युसूफ मेमन (सर्व रा. देवीचा मळा) या तिघांनी आपण माझ्या सुपारीचे कॉन्ट्रॅक्ट घेऊ नका, असे समजावून सांगितले असता त्याचा राग आल्याने आपल्याला व मुलगा शोहेबला चापटीने मारहाण केली. अज्जू मेमन याने धारदार कटरने माझ्या पाठीवर, तर मुलगा शोहेबच्या डाव्या हातावर वार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पवारवाडी व रमजानपुरा पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT