Police with victim esakal
नाशिक

Nashik Crime: अज्ञात समाज कंटकाचा खोडसाळपणा; कांदाचाळीत युरिया टाकल्याने साडे बावीस लाखांचे नुकसान

- दीपक खैरनार

Nashik Crime : कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी कांद्याला भाव वाढतील या भाबड्या अपेक्षेने कांदा चाळीत साठवून ठेवला आहे. मात्र याच साठवून ठेवलेल्या कांद्यावर विघ्नसंतोषी समाजकंटकांनी नजर टाकल्याचे चित्र परिसरात निर्माण झाले आहे.

चाळीत साठवून ठेवलेल्या तब्बल चाळीस ते पंचेचाळीस ट्राॅली कांद्यावर अज्ञाताने युरिया टाकल्याने २२ लाख ६८ हजारांहून अधिकचे नुकसान कांदा उत्पादक शेतकऱ्याचे झाले असून सदर शेतकऱ्याने जायखेडा पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. (Mischief of Unknown Loss of twenty two lakhs due to putting urea in Kandachali at ambasan Nashik Crime)

मोराणे सांडस (ता.बागलाण) येथील शेतकरी निंबा दादाजी शेवाळे हे कुटूबिंयासह परिसरातील इतर शेतकऱ्यांची शेतजमीन तोडबटाईने करतात. यावर्षी त्यांनी उन्हाळ कांद्यावर लक्ष केंद्रित करून भरघोस उत्पादन घेतले होते.

श्री. शेवाळे यांनी कांदा साठवणूकीसाठी गावाशेजारील भवानी मातेच्या मंदिरानजीक गावठाण जागेतील मालकीच्या खळवाडीत कांदा चाळ उभारली आहे. मोठ्या मेहनतीत कांदा उत्पादक शेतकरी कुटुंबाने कांदा सुरक्षित राखला.

बाजारपेठेत भाव वाढतील या अपेक्षेने चाळीत पन्नास ते साठ ट्राॅली कांदा चाळीत साठवून ठेवला होता. मात्र बुधवार (ता.२६) रोजी निंबा शेवाळे खळवाडीत फेरफटका मारण्यासाठी गेले असता त्यांना कांदा चाळीत युरीया टाकलेला निदर्शनास आला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मोठ्या कष्टातून चाळीत साठवून ठेवलेल्या कांद्यावर अज्ञात समाजकंटकाने युरिया टाकल्याने त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आणि आपण कुणाचेही वाईट केले नाही असे म्हणत अश्रूंना वाट मोकळी केली.

कुटुंबातील सदस्यांना याबाबत माहिती मिळताच टाहो फोडला होता. निंबा शेवाळे यांनी जायखेडा पोलिस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात तक्रार दाखल करताच पोलिस उपनिरीक्षक नवनाथ रसाळसह, महसूल विभागाचे तलाठी जयप्रकाश सोनवणे यांनी भेट दिली व वरीष्ठांच्या आदेशान्वये पंचनामा केला असून पोलिस प्रशासनाकडून संबंधित समाजकंटकाचा कसोशीन शोध घेत आहेत.

अज्ञात इसमाने कांदा चाळीत युरिया टाकल्याने कांदा उत्पादक शेतक-याचे २२ लाख ६८ हजारांचे नुकसान झाले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : उत्तरेत थंडीची लाट तर दक्षिणेत पावसाचा कहर; महाराष्ट्रात पुढील तीन दिवस कसे असेल हवामान? जाणून घ्या

Satara News: सातारा जिल्ह्यातील ‘जयवंत शुगर’, ‘ग्रीन पॉवर’ला ३८ लाखांचा दंड; साखर आयुक्तांचे आदेश, नेमकं काय कारण?

Panchang 18 December 2025: आजच्या दिवशी दत्त कवच स्तोत्राचे पठण व ‘बृं बृहस्पतये नमः’ या मंत्राचा जप करावा

फायद्याची बातमी! नोटरी केलेल्या गुंठेवारीची आता करता येणार खरेदी; पूर्वीच्या गुंठ्याची करता येणार थेट विक्री, कशी असणार प्रक्रिया, वाचा...

ढिंग टांग - सं. मनोमीलन : अंक दुसरा..!

SCROLL FOR NEXT