tribal
tribal  esakal
नाशिक

आयुर्वेदामुळे गैरसमज, भीती गेली; मिळाली कोरोनामुक्ती!

महेंद्र महाजन

नाशिक : दुर्गम भागातील आदिवासी बांधवांचा गैरसमज अन्‌ भीती आयुर्वेदामुळे गळून पडली. आदिवासी बांधवांचा विश्‍वास आणि स्वीकारार्हता असलेल्या आयुर्वेदामुळे कोरोनामुक्तीचा मार्ग गवसल्याचे ‘सुरगाणा पॅटर्न’मध्ये सहभागी झालेल्यांचे म्हणणे आहे. सरकारी दवाखान्यात उपचार नको म्हणून घरी थांबलेल्या आदिवासी बांधवांपर्यंत जिल्हा परिषदेचे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी पोचले. नाशिकचे वैद्य विक्रांत जाधव यांच्याशी ऑनलाइन संवाद घडवून आणत नेमकी चिकित्सा करत ‘आयुष’ची मान्यता असलेली आयुर्वेदिक औषधे रुग्णांपर्यंत पोचवण्यात आली. त्यातूनच सुरगाणा तालुका कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलाय. त्याबद्दलचा रुग्णानुभव... (misconceptions-fears-away-of-corona-because-Ayurveda-nashik-marathi-news)

ऑक्सिजन ८६ वरून पोचला ९६ वर

चंदर भोये (वय ३५) : खोकला, दम लागणे आणि तीन दिवसांपूर्वी ताप ही लक्षणे असताना बोरगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी केली. अहवाल पॉझिटिव्ह आला. पण, कोरोना केअर सेंटर अथवा डेडीकेटेड कोरोना हेल्थ सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल होण्याची भीती वाटत होती. त्यामुळे बोरगावचे डॉ. कैलास निंबाळकर यांना दवाखान्यात जाण्यास नकार दिला. त्या वेळी माझी ऑक्सिजन पातळी ८६ होती. मी घरीच थांबलो. दुसऱ्या दिवशी डॉ. निंबाळकर घरी आले. त्यांच्यासोबत आयुर्वेदिक औषधे होती. आयुर्वेदावर विश्‍वास असल्याने मी ही औषधे घेण्यास सुरवात केली. डॉ. निंबाळकर आणि सरकारी दवाखान्यातील कर्मचारी रोज माझी ऑक्सिजन पातळी तपासत होते. शनिवारी (ता. ५) माझी ऑक्सिजन पातळी ९६ होती. आयुर्वेदिक औषधांमुळे माझी भूक वाढली, खोकला कमी झाला. दम लागणे कमी झाले.

सरपंच गृहविलगीकरणात झाले ठणठणीत

रमेश वाडेकर (दरपाडा-देवळा-गोंदुणे) : सरपंच असल्याने जनतेच्या अडचणींसाठी जनसंपर्कात होतो. त्यात मलाही कधी कोरोनाची लागण झाली, हे कळाले नाही. एक दिवस सकळी एकदम दम लागू लागला, आवाज खोल गेला, अशक्तपणा अशी लक्षणे जाणवू लागली. तत्काळ पांगारणे प्राथमिक आरोग्य केंद्रात गेलो. ॲन्टिजेन टेस्ट केली, ती पॉझिटिव्ह आल्याने आजाराबद्दल थोडी भीती वाटली. सरपंच आजारी पडले हे ज्यांना कळाले, ते तणावात आले. मात्र, डॉ. चैतन्य बैरागी व डॉ. जयेंद्र थविल यांनी माझ्यासह सर्वांना मानसिक आधार दिला. पुढील औषधोपचारासाठी सुरगाणा कोरोना केअर सेंटरमध्ये पाठवले. मात्र, माझी मानसिकता नसल्याने अधिक दिवस तेथे थांबलो नाही. गृहविलगीकरणात राहिलो. डॉ. बैरागी यांनी ‘सुरगाणा आयुर्वेदिक पॅटर्न’बद्दल माहिती दिली. आयुर्वेदिक औषधांवर अधिक विश्‍वास असल्याने मी आयुर्वेदिक औषधे घेणे पसंत केले. ‘नेटवर्क’चा प्रश्‍न असल्याने डोंगरावर जाऊन डॉ. बैरागी यांनी वैद्य जाधव यांच्याशी संवाद घडवून आणला. आता खूप छान फरक पडला. आत्मविश्‍वास वाढला. घरचे आणि गावातील लोकही आता निश्‍चिंत आहेत. डॉ. मिथिलेश अहिरे यांनी वारंवार भेट देऊन विचारपूस केली. आता किरकोळ थकवा आहे. त्यासाठी पुन्हा औषधे मागविली आहेत. आता मी माझे गावाची आणि भातशेतीचे कामे करू शकेल, असा विश्‍वास आहे.

धाप-थकवा झाला हद्दपार

हिरामण गायकवाड : मला खूप दिवसांपासून अशक्तपणा जाणवत होता. ऑक्सिजनची पातळी कमी म्हणजे ८७ असल्याची माहिती डॉक्टरांकडून मिळाली. मला धाप लागायची, थकवा जाणवत होता. सुरगाणामधील डेडीकेटेड कोरोना हेल्थ सेंटरचे डॉ. पांडुले यांनी माझ्यावर आयुर्वेदिक औषधोपचार सुरु केले. थोड्या दिवसांतच मला जाणवणारा त्रास कमी झाला आणि मी पूर्णपणे बरा झालो. माझी ऑक्सिजनची पातळी ९६ झाली. डॉ. पांडुले, डॉ. योगिता जोपळे, सेंटरमधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचा मी आभारी आहे.

ऑक्सिजन पातळी ८७ वरून ९८

पांडू पालवा : सुरगाणा डेडीकेटेड कोरोना हेल्थ सेंटरमध्ये मी दाखल झालो, तेव्हा ऑक्सिजनची पातळी ८७ होती. कोरोनाची लागण झाल्यावर सुरवातीला धाप लागायची. थकवा जाणवयाचा. अशावेळी आयुर्वेदिक औषधोपचारांनी मला चांगलाच फरक पडला. ऑक्सिजनची पातळी ९८ झाली. त्यामुळे डॉ. पांडुले, डॉ. योगिता जोपळे आणि सेंटरमधील डॉक्टरांचे मी आभार मानतो.

घरचे सर्व आयुर्वेदिक औषधांनी झाले बरे

विमलबाई पगार (चिंचपाडा) : माझ्या कुटुंबातील माझ्यासह सहा जण पॉझिटिव्ह होते. पांगारणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. बैरागी यांनी आम्हाला धीर दिला. उपचारासाठी सुरगाणामधील कोरोना केअर सेंटरमध्ये पाठवले. तेथे माझी ऑक्सिजनची पातळी खूप कमी झाल्याने डेडीकेटेड कोरोना हेल्थ सेंटरमध्ये हलवण्यात आले. थोडे बरे वाटू लागल्यावर घरी सोडले. मात्र घरी आल्यावर मला दम लागायचा. सूनबाईंनी डॉ. बैरागी यांच्या सल्ल्यानुसार सुरगाणा आयुर्वेदिक पॅटर्नमधील मोफत आयुर्वेदिक औषधे मागवली. या औषधांनी तिचा कोरोनाचा त्रास कमी झाला. म्हणून आमच्या घरातील सर्वांनी डॉ. बैरागी यांच्याकडून तपासणी करून घेतली. माझी ऑक्सिजन पातळी ९४ होती. चालल्यावर आणि अंघोळ केल्यावर ही पातळी ९० च्या खाली जात होती. खोकला होता. बसवत नव्हते. डॉ. बैरागी यांनी वैद्य जाधव यांच्याशी संवाद घडवून आणला. त्यानंतर माझ्यासह सर्वांना डॉ. जाधव यांनी आयुर्वेदिक औषधे पाठवून दिली. त्यात माझा दोन वर्षांचा नातूही होता. आयुर्वेदिक औषधांचा चांगला फरक जाणवत असून, अंघोळीनंतर दम लागणे कमी झाले. खोकला येत नाही. बसण्यात अडचण जाणवत नाही.

केशव झिरवाळ म्हणतात खूप बरं वाटतंय...

केशव झिरवाळ (माणी) : मी कोरोना पॉझिटिव्ह झालो. त्या वेळी माझ्या पायाखालची जमीन हलली. प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. मधुकर पवार यांनी मला सुरगाणामधील सरकारी दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला. खूप भीती वाटत होती. एकदा सरकारी दवाखान्यात गेलो, तर परत यायचे काही खरे नाही, म्हणून मी नकार दिला. सरकारी दवाखान्यातील गोळ्या घेतल्या नाहीत. कशावरही विश्‍वास बसत नव्हता. डॉ. पवार यांनी सुरगाणा आयुर्वेदिक पॅटर्नची माहिती दिली. आयुर्वेदिक औषधांवर विश्‍वास असल्याने मी लगेच होकार दिला. डॉ. पवार यांनी वैद्य जाधव यांच्याशी ऑनलाइन संवाद घडवून दिला. त्यांच्याकडून मोफत औषधे घरी मिळाली आणि औषधे घेण्यास सुरवात केली. दम लागणे, खोकला, भूक न लागणे हा त्रास हळूहळू कमी झाला. आता मला खूप बरं वाटतय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suchrita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

घर का न घाट का... उन्मुक्त चंदच ड्रीम झालं उद्ध्वस्त! गुजराती खेळाडू बनला World Cupमध्ये अमेरिकन संघाचा कर्णधार

Pratik Gandhi : प्रतीक साकारतोय गांधी ; हॅरी पॉटर फेम 'या' अभिनेत्याची सिनेमात वर्णी

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

SCROLL FOR NEXT