MLA Devyani Farande esakal
नाशिक

''धोकादायक उघड्या वीजतारांबाबत ऊर्जामंत्री उदासीन''

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिक शहरातील धोकादायक उघड्या वीजतारांबाबत राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) उदासीन आहेत. नाशिकच्या ऊर्जा प्रश्नांबाबत बुधवारी (ता. ९) पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या पुढाकाराने मुंबईत झालेल्या बैठकीत ऊर्जामंत्री राऊत यांची नाशिक शहरातील प्रश्न सोडविण्याबाबत अनास्था समोर आली, असा आरोप आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी केला.

ओव्हर हेड वीजतारा हा अत्यंत गंभीर विषय

बैठकीनंतर आमदार फरांदे यांनी निवेदनाद्वारे ऊर्जामंत्र्यांच्या कामकाजावर टीका केली आहे. फरांदे यांच्या निवेदनानुसार नाशिक शहर औद्योगिक नगरी असताना ऊर्जा विभागाकडून वीजपुरवठा हा खंडित स्वरूपाचा असतो. कमी दाबामुळे त्याचा परिणाम होऊन शहरातील अनेक नागरिकांचे इलेक्ट्रिकचे साहित्य जळाल्याने आर्थिक नुकसान झाले आहे. शहरातील खासकरून गावठाण भागातील ओव्हर हेड वीजतारा हा अत्यंत गंभीर विषय असून या तारा भूमिगत करण्यासाठी ऊर्जा विभागाकडे निधीची मागणी केली. स्मार्टसिटीअंतर्गत सुरू असलेल्या व पूर्णत्वास आलेल्या रस्त्यांवरील वीजतारा भूमिगत करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी ऊर्जामंत्री यांच्याकडे केली होती. मात्र बैठकीत नाशिक शहराला भेडसावणाऱ्या समस्यांबाबत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची अनास्था समोर आली.

नाशिक शहराला नियमित दाबाने वीजपुरवठा करण्याबाबत किंवा नाशिक शहरातील ओव्हर हेड वीजतारा भूमिगत करण्याबाबत नितीन राऊत यांच्याकडून कोणतेही ठोस आश्वासन दिलेले नाही. त्यामुळे ऊर्जा विभाग शहरातील उघड्या व धोकादायक वीजतारांबाबत उदासीन असल्याचे दिसून येते, असाही आरोप आमदार फरांदे यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT