MLA Nilesh Lanke helped accident victim latest marathi news esakal
नाशिक

Nashik : आमदार निलेश लंके धावले अपघातग्रस्ताच्या मदतीला

अजित देसाई

सिन्नर (जि. नाशिक) : जनमानसाप्रती तळमळ असलेला कार्यकर्ता ते लोकनेता अशी ओळख असलेल्या पारनेर विधानसभा क्षेत्राचे आमदार निलेश लंके (MLA Nilesh Lanke) यांनी गुरुवारी दि.14 दुपारी नाशिक पुणे महामार्गावर सिन्नर जवळ झालेल्या अपघातातील (Accident) दुचाकीस्वारास स्वतःच्या वाहनातून रुग्णालयात नेत त्याचे प्राण वाचवले. बेशुद्ध पडलेल्या या रुग्णासाठी ते तब्बल दोन तास रुग्णालयातच थांबून होते. (MLA nilesh Lanke rushed to help accident victim nashik Latest Marathi News)

नाशिक-पुणे महामार्गावर माळेगाव औद्योगिक वसाहती जवळच्या एल अँड टी फाट्यावर ट्रकने समोरून धडक दिल्याने निफाड तालुक्यातील धारणगाव विर येथील रहिवाशी कल्याण शिवाजी सानप (42 ) या दुचाकीस्वारास अपघात झाला होता.

या अपघातात नाशिकहून सिन्नरकडे येणाऱ्या श्री सानप यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखांबत होऊन रक्तस्राव होत होता. अपघात झाला त्याच क्षणाला नाशिकहून पारनेरच्या दिशेने आमदार निलेश लंके जात होते. त्यांनी अपघात पाहून आपले वाहन थांबवले.

जखमी दूचाकीस्वाराची विचार करून त्याला धीर दिला. मात्र अतिरक्तस्राव झाल्याने सदर जखमी व्यक्ती बेशुद्ध झाली होती. सिन्नरचे माजी नगरसेवक हर्षद देशमुख यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत आमदार लंके यांनी देशमुख यांना अपघाताची माहिती दिली. व सिन्नर मधील चांगले रुग्णालय कुठे आहे याबाबत विचारणा केली.

श्री. देशमुख यांनी आपण अपघात स्थळी जखमी व्यक्तीस नेण्यासाठी रुग्णवाहिका पाठवतो असे सांगितले. मात्र, आमदार लंके यांनी रुग्णवाहिका येण्याची वाट न बघता जखमी अवस्थेतील श्री. सानप यांना उचलून आपल्या वाहनात घेतले. व देशमुख यांनी सांगितलेल्या रुग्णालयात उपचारासाठी आणले.

डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव झाल्याने जखमी झालेल्या श्री. सानप यांची शुद्ध हरपली असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर आमदार लंके तेथेच तब्बल दोन तास थांबून होते. रुग्णालयात आलेल्या सानप यांच्या नातेवाईकांनाही त्यांनी धीर दिला. जखमी सानप यांच्यावर योग्य पद्धतीने उपचार करा. आवश्यकता असेल तर नाशिकच्या रुग्णालयात पाठवा अशी सूचना देऊन आमदार लंके पुढच्या प्रवासाला रवाना झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Crime: ठाणे हादरलं! भाजप आमदारांच्या घरासमोरच गोळीबार; १ जण गंभीर जखमी, नेमकं काय घडलं?

Video : समोरा समोर दोन बसची भयानक टक्कर; अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल, पाहून शॉक व्हाल..

Latest Maharashtra News Updates : धुळे बाजार समितीच्या आवारात घाणीचे साम्राज्य

Air Force Recruitment 2025 : बारावी पास विद्यार्थ्यांसाठी हवाई दलात सामील होण्याची ‘सुवर्ण संधी’ !

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

SCROLL FOR NEXT