Ajit Pawar  
नाशिक

अजित पवारांचा आमदार पलटला! शिक्षक मतदारसंघासाठी ठाकरे गटाच्या उमेदवाराला दिला जाहीर पाठिंबा

MLA of Ajit Pawar narhari jhirwal: महायुतीचा उमेदवार नाशिकमध्ये असताना झिरवळ यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

कार्तिक पुजारी

मुंबई- शिक्षक आणि पदवीधर जागांसाठीची निवडणूक चांगलीच रंगात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवळ यांनी ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी ठाकरे गटाचे उमेदवार संदीप गुळवे हे उमेदवार आहेत. महायुतीचा उमेदवार नाशिकमध्ये असताना झिरवळ यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

नाशिक शिक्षक मदरारसंघासाठीची निवडणूक चुरशीची होत असताना दिसत आहे. ठाकरे गटाचे उमेदवार संदीप गुळवे यांनी नरहरी झिरवळ यांची वाढदिवसानिमित्त भेट घेतली. त्यावेळी नरहरी झिरवळ यांनी जाहीरपणे संदीप गुळवे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना सुरुवात झाली आहे.

आपल्यासोबत असलेल्या शिक्षकांना संदीप गुळवे यांचे काम करण्यास सांगणार असल्याचं झिरवळ म्हणाले आहेत. महायुतीचे दोन उमेदवार सध्या नाशिक शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार आहेत. असे असताना झिरवळ यांनी ठाकरे गटाच्या उमेदवाराला समर्थन दिले आहे. त्यामुळे पक्ष त्यांच्यावर काही कारवाई करतं का? हे पाहावं लागणार आहे.

आज नरहरी झिरवळ यांचा जन्मदिवस आहे.त्यांच्या वाढदिवसानिमित्त लागलेल्या बॅनरवर शरद पवार यांचे फोटो छापण्यात आले आहेत. शिवाय झिरवळ यांनी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या आहेत. त्यामुळे ते कोणता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत का असा प्रश्न लोकांना पडत आहे.

झिरवळ काय म्हणाले?

शरद पवारांसारखे मोठे काम कोणी केले नाही आणि कोणी करणार देखील नाही. पण, अजित पवारांसारख्या शिस्तप्रिय नेत्यांच्या नेतृत्त्वात आम्हाला काम करत राहायचं आहे. त्यामुळे या सुरु असलेल्या चर्चांचा काहीच अर्थ नाही. संदीप भाऊंना गुळवेंसाहेबांचा वारसा आहे. सर्वसामान्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम पुढे सुरु ठेवण्यासाठी संदीप भाऊंना आमचा पाठिंबा आहे, असं ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Conflict End : ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य! इराण युद्ध संपण्याच्या उंबरठ्यावर, इस्रायल, यूएई, सौदीचे मानले आभार

Chhatrapati Sambhajnagar: दिवसभर उकाडा; सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी; विजांच्या कडकडाटासह शहरभर पावसाचे आगमन

Shaktipith Highway Kolhapur : शक्तिपीठ महामार्गाचा नकाशा बदलला, कोल्हापूर जिल्ह्यातील कागल, शिरोळ, हातकणंगले वगळले

Pune Rain News: पुण्याला गारांच्या पावसाचा तडाखा; मध्यवर्ती भागासह उपनगरांत नागरिकांची तारांबळ, झाडपडीच्‍या आठ घटना!

Chhatrapati Sambhajinagar: त्याने भरले बेरंगी आयुष्यात रंग!; ऑटिझमवर मात करीत स्वराज राजपूत बनला आईचा आधार

SCROLL FOR NEXT