Hindu Jan Akrosh Morcha . MLA Nitesh Rane, Prof. Devyani Farande, Suresh Chavanke and Samajbandhav.
Hindu Jan Akrosh Morcha . MLA Nitesh Rane, Prof. Devyani Farande, Suresh Chavanke and Samajbandhav. esakal
नाशिक

Hindu Jan Akrosh Morcha : रेल्वेनंतर सर्वाधिक जागा ‘वक्फ’ बोर्डाचीच : आमदार राणे

सकाळ वृत्तसेवा

Hindu Jan Akrosh Morcha : भारतात रेल्वे आणि संरक्षण दलानंतर सर्वाधिक जागा ही मुस्लिम धर्मीयांच्या ‘वक्फ’ बोर्डाकडे आहे. ‘वक्फ’ बोर्डाच्या नावाखाली हिंदूंच्या जागांवर कब्जा केला जात आहे.

पण, देशात आता हिंदूंचे सरकार असल्याने यापुढे अशी दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा देत आमदार नीतेश राणे यांनी ‘वक्फ’च्या विरोधात सरकार तुमच्या पाठीशी असल्याचा विश्वास नाशिकमध्ये व्यक्त केला. (MLA Rane statement on Waqf Board has highest number of seats after railway hindu jan akrosh morcha nashik news)

‘वक्फ’ कायदा रद्द करण्यासाठी सकल हिंदू समाजातर्फे रविवारी (ता. ११) जिल्हाधिकारी कार्यालयावर हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. मध्यवर्ती बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर रस्त्यावर जाहीर सभा झाली, त्या वेळी आमदार राणे बोलत होते. व्यासपीठावर सुरेश चव्हाणके, काजल हिंदुस्तानी, भारतानंद सरस्वती आदी उपस्थित होते.

श्री. राणे म्हणाले, की वक्फ कायदा हा केवळ भारतातच आहे. मुस्लिम राष्ट्रांमध्येही हा कायदा लागू केलेला नाही. मग बहुसंख्य हिंदू असलेल्या भारतात हा कायदा कशासाठी हवा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. २०४७ पर्यंत भारताला मुस्लिम राष्ट्र करण्याचे यांचे षडयंत्र आहे. हा कायदा आम्हाला मान्य नाही.

तो तत्काळ रद्द करावा. या वक्फ बोर्डात एकही हिंदू नाही. याविरोधात लढा देणे आवश्यक आहे. जेथे या बोर्डाची माणसे जमीन मागायला येतील, तेथे हिंदूंनी एकत्र येऊन आवाज उठवायला हवा. हिंदू बांधवांनो, पेटून उठा ! ‘त्यांचा अली, तर आमचा बजरंगबली’ ही घोषणा कायम लक्षात ठेवा.

भारतात सीरिया आणि पाकिस्तान यांच्याप्रमाणे शरीयत कायदा लागू करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. हिंदूंनी वेळीच डोळे उघडले नाहीत, तर हे संकट आपल्या दाराशी आल्याशिवाय राहणार नाही. दिल्लीतील ७७ टक्के जागा ‘वक्फ’ बोर्डाच्या ताब्यात आहे. आपल्याला सर्वधर्म समभाव शिकविला जातो. पण, आम्ही सर्वधर्म समभाव मानत नाही.

आमच्यावर दादागिरी चालणार नाही. संविधानाप्रमाणे देश चालतो; पण सिव्हील न्यायालयाइतके अधिकार ‘वक्फ’ बोर्डाला बहाल केले आहेत. त्यांच्या नावाने कुणी जमीन बळकावली तर त्या जागेवर लगेच बजरंग बलीचे मंदिर उभारा, असा सल्लाही त्यांनी दिला.

बाबरी हा फक्त बहाणा

काजल हिंदुस्तानी म्हणाल्या, की बाबरी मशिद अजून का उभी राहिली नाही. विशेष म्हणजे बाबरी मशिदीला आता मोहम्मद बिन अब्दुल्ला मशिद असे नाव दिले जाणार आहे. त्यामुळे बाबरी हा फक्त बहाणा असल्याचे त्यांनी म्हटले. यापुढे आपल्याला ‘गजवा- ए-हिंद’ रोखण्यासाठी लढावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

७५ टक्के मुस्लिमांनी हिंदूंची जागा घेतली

गेल्या ७५ वर्षांच्या कार्यकाळात देशात खरेदी झालेल्या जागांमध्ये ७४.९ टक्के जागा मुस्लिमांनी खरेदी केल्या आहेत. या सर्व जागा हिंदूंच्या आहेत. ‘हलाल’चा लोगो असलेल्या वस्तूंच्या खरेदीवर यापुढे बहिष्कार टाकण्याचे आवाहन सुरेश चव्हाणके यांनी केले.

मालेगाव किल्ल्याबाहेरील अतिक्रमण हटणार

मालेगावमधील किल्ल्याबाहेरील अतिक्रमण हटविण्याचे काम महापालिकेने सुरू केले आहे. येथे स्वतंत्र पोलिस चौकीही उभारण्यात येईल. याची पाहणी करण्यासाठी ‘ईद’च्या दिवशी आपण मालेगावला जाणार असल्याची घोषणा आमदार राणे यांनी केली. राज्य सरकार ‘लव्ह जिहाद’विरोधात लवकरच कठोर कायदा करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Paresh Rawal: "मतदान न करणाऱ्यांचे टॅक्स वाढवा.."; परेश रावल यांनी केली शिक्षेची मागणी

RCB vs CSK: चेन्नईला पराभूत झालेलं पाहताच दिग्गज क्रिकेटरचे पाणावले डोळे, Video होतोय व्हायरल

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Apple News : ॲपल कंपनीने नाकारले १७ लाख ऍप ; जाणून घ्या काय आहे प्रकरण

SCROLL FOR NEXT