Crime News esakal
नाशिक

Nashik Crime Update : बहिणीच्या अल्पवयीन मैत्रिणीचा विनयभंग; एकाला अटक

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पीडितेच्या भावाला पकडून ठेवण्याचे खोटेच सांगून शाळेजवळ बोलावून घेतलेल्या अल्पवयीन पीडितेचा विनयभंग केल्याप्रकरणी तिघांविरोधात उपनगर पोलिसात पोस्को अन्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुख्य संशयिताला अटक करण्यात आली आहे. पीडित मुलगी ही संशयिताच्या बहिणीची मैत्रिण आहे.

आनंद मुरलीधर धोंगडे (रा. आम्रपाली झोपडपट्टी, कॅनॅल रोड, जेलरोड) असे अटक करण्यात आलेल्या मुख्य संशयिताचे नाव असून, त्याचे दोन साथीदार पसार आहेत. पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित आनंद हा पीडित अल्पवयीन मुलीच्या मैत्रिणीचा भाऊ आहे. संशयित आनंद व त्याच्या दोन साथीदारांनी गेल्या शुकव्रारी (ता. 11) सकाळी अकरा वाजेच्यासुमारास के. जे. मेहता स्कूलच्या बाजूला असलेल्या साई बाबा मंदिरामागे पीडितेला तिच्या भावाला पकडून ठेवल्याचे खोटेच सांगितले. (Molestation of Sister minor Friend One Arrested Nashik Crime News)

त्यामुळे पीडिता घाबरली व क्षणाचाही विलंब न लावता भावाला पाहायला तिथे पोहोचली. त्यावेळी संशयित आनंद याने हा सर्व बनाव रचल्याचे तिच्या लक्षात आले. त्यावेळी संशयितानंद याने पीडितेचा हात पकडून शाळेत जाण्यापासून अडविले. तसेच, तु माझ्याशी का बोलत नाहीस, मला ब्लॉक का केले असे बोलून तिचा विनयभंग केला.

या दरम्यान सुदैवाने एका शालेय बस चालकाचे लक्ष गेल्याने त्याने धाव घेतली. त्याला बघून तिघा संशयितांनी दुचाकीवरून पसार झाले. पीडित मुलीने सदरचा प्रकार शाळेच्या शिक्षिकेला सांगितला. यानंतर शिक्षिकेने मुलीच्या पालकांशी मोबाईलवरून संपर्क साधून माहिती दिली. पालकांनी शाळेत धाव घेतली आणि मुलीसह उपनगर पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी उपनगर पोलिसात पोस्को अन्वये विनयभंगांचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आनंद यास अटक करण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक चौधरी हे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT